देशव्यापी संपाबाबत नागपूरात झाली चर्चा

0
14

गोंदिया(berartimes.com),दि.13-येथील हिंदी मोर भवन सभागृहात आज(दि.13)जॉइंट काऊंशील ऑफ ट्रेड युनियन्स एन्ड असोसियेशन्स नागपूर द्वारे आयोजित सभेत 2 सप्टेंबर च्या देशव्यापी संपाबाबत विदर्भातील सर्व कर्मचारी संघटनाच्या प्रतिनिधींचे संमेलन घेण्यात आले.या समेलंनात नागपूर विभागातील संघटित व असंघटित क्षेत्रातील 17 संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. संमेलनाचे अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस अशोक थुल हे होते. प्रमुख वक्ते मध्यप्रदेश संघटनेचे महासचिव सरोज बादल,मुंबई राज्य संघटनेचे महासचिव सज्जनराव शेट्टे,गुरुप्रीत सिंग ,उमेशचंद्रे चिलबुले,लिपिक संघटना महाराष्ट्र अध्यक्ष शालीक माऊलिकर, मध्यवर्ती संघटनेचे अशोक दगडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी प्रत्येक संघटनांचे पदाधिकार्यांनी मत व्यक्त करून 2 सप्टेंबरचा देशव्यापी संप यशस्वी करण्याचे आवाहन केले. या संपामध्ये राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद, बँक, एल.आय.सी., मेडिकल रेप्रेंझेंटेटीव्ही, कोल माईन्स, पेंशन असोसिएसन, रेल्वे मजदूर, बी.एस.एन.एल., अंगणवाडी, अंश कालीन स्त्री परिचर, आणि इतर सर्व कंत्राटी कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याचे कळविण्यात आले.संपात गोंदिया जिल्ह्यातील सर्ववर्गीय कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती नागपूर येथील संमेलनात देण्यात आली.गोंदिया जिल्ह्यातून महासंघाचे अध्यक्ष पी.जी.शहारे, लिपिक संघटनेचे अविनाश मोगरे, स.प्र.अ./क.प्र.अ. संघटनेचे बन्सोड, व वाहन चालक संघटनेचे वानखेडे सहभागी झाले होते.