वडसा येथे नाटय गृह उभारणीस 5 कोटी – सुधीर मुनगंटीवार

0
9

गडचिरोली,दि.17: झाडीपट्टी रंगभूमीचे माहेरघर असणाऱ्या वडसा (देसाईगंज) येथे अद्ययावत आणि वातानुकूलीत असे नाटयगृह उभारण्यासाठी 5 कोटी रुपये देण्याची घोषणा राज्याचे वित्त व नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
वडसा नगरपालिकेच्या विविध विकास कामांचे लोकार्पण मुनगंटीवार यांच्या हस्ते मंगळवारी रात्री झाले. त्याप्रसंगी माता वार्ड येथील सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम हे होते.
या वेळी व्यासपीठावर खासदार अशोक नेते, स्थानिक आमदार कृष्णा गजबे, गट नेता किसन नागदेवे, नगराध्यक्ष श्याम उईके, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, मख्याधिकारी तैमुर मुलाणी आदींची उपस्थिती होती.