मोटारसायकल अपघातात एक ठार ,तीघे जखमी

0
20

तुमसर,दि.18-तुमसर ते रामटेक राज्यमार्गावरील धोप-नागठाणा गावाच्या मध्ये आज सकाळी साडेवाजेच्या सुमारास झालेल्या मोटारसायकल अपघातात एक जण ठार तर तीघे जखमी झाल्याची घटना घडली.मृतामध्ये मोहीत हेमराज रहागंडाले (वय10) चा समावेश आहे.तर जखमीमध्ये हेमराज आत्माराम रहागंडाले व तन्नु हेमराज रहागंडाले रा.मदनापूर ता. वारासिवनी जि.बालाघाट यांचा समावेश आहे.मोटारसायकलने हे चौघेजण हे नागपूरवरुन आपल्या गावी परत जात असताना मोहाडी तालुक्यातील धोप -नागठाण दरम्यान हा अपघात घडला.चौथा व्यक्ती नंदकिशोर टोलीराम बिसेन हा सुध्दा जखमी असून तुमसर ग्रामीण रुग्णालयात उपचारानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली.आंधळगाव पोलीस याप्रकरणी तपास करीत आहे.