गणित विषयांच्या अध्ययन – अध्यापनात ज्ञानरचनावादाची भुमिका-एस.ओ.श्रीवास्तव

0
145

माध्यमीक स्तरांवरील गणित विषयांच्या अध्ययन – अध्यापनात ज्ञानरचनावादाची भुमिका
शाळेची ज्ञानसंक्रमणाची पारंपारीक भुमिका आहे आणि या भुमिकेत शिक्षक हा ज्ञान संक्रमक समजला जातो. त्यामूळे अपत्यक्षपणे व नकळत शिक्षकाची भुमिका कर्मठतेकडे गेली. एकीकडे आनंदायी शिक्षणाची अपेक्षा करने आणि दुसरीकडे याच शिक्षक प्रक्रियेतील सर्वाधिक महत्वपुर्ण घटक विद्यार्थी यास निष्क्रीय ठेवत शिक्षकांची एकाधिकार शाही वृध्दींगत ठेवणे, हे विसंगती आहे. या वीसंगतीतून सुसंगता, साधणारा दुवा म्हणजे ज्ञानरचनावाद होय. ज्ञानसंक्रमण या संकल्पनेस तडा देत ज्ञानरचनावादाचा राष्टÑीय अभ्यासक्रम आराखडा ने सर्वस्तरावर पुरस्कार केलेला आहे. पुर्व ज्ञानाच्या/पुर्व अनुभवाच्या आधारे जेव्हा व्यक्ती नवीन संकल्पनाची/संबोधनाची रचना करते तेव्हा त्यातून अध्ययन घडते यास ज्ञानरचनावाद किंवा ज्ञान संरचनावाद असे म्हणतात. ज्ञानावर आधारीत चाचण्यांमधून मुले काय शिकली आहेत आणी समस्या सोडविण्यासाठीच्या उपाययोजनासाठी हे ज्ञान वापरण्यांची त्यांची क्षमता किती आहे याची तपासणी केली पाहिजे त्याच बरोबर त्यांच्या विचार प्रक्रियाही तपासल्या गेल्या पाहिजेत. परीक्षेसाठी घातलेल्या प्रश्नांची मर्यादा पुस्तकातील प्रश्नांनी ओलांडून जाणारी असावी शिक्षकांनी सांगीतले तेवढेच ज्ञान हा विचार बदलून विद्यार्थ्याने स्वत: ज्ञानाची निर्मिती करावी ही अपेक्षा आहे. ज्ञानरचनावादातील विविध कार्यनीती मध्ये पृच्छा वर्गीकरण, विश्लेषण, संकल्पना, चित्रण, सांधीक शब्दजाल मुक्तप्रश्न समस्या निराकरण, प्रकल्प पध्दती प्रायोगीकता सहकार्यातून अध्ययन इत्यादींच्या समावेश होतो.

ज्ञानरचनावादी वर्ग अध्यापन उद्गामी विचार प्रतिमान
हिल्डा टाबा यांनी उद्गामी विचार प्रतिमानात पुढील ३ परीणामकारक कार्यनीती विकसीत केलेल्या
१:- संकल्पना निर्मिती
उदा. तुम्हाला माहिती असलेली समिकरणे लिहा त्यांच्यातील साम्यानुसार त्यांचे दोन गटात वर्गीकरण करा तुमच्या यादीतील कोणकोणती समिकरणे एका गटात जाउ शकतात गटाचे नावे द्या.
विद्यार्थ्यांनी एकचल, व्दीचल, वर्ग समिकरणे तसेच नित्य समानता लिहिलेल्या काहींनी एक चलातील समिकरणे व दोन चलातील समिकरणे असे दोन गट केले तर काहींनी जास्तीतजास्त घातांक १ असलेली व घातांक २ असलेली समीकरणे असे दोन गट केले.
यासाठी शिक्षकांनी काय करावे या बद्यल हिल्डा टाबा यांनी काही नमुद केले आहे. वेगवेगळी उदाहरणे यादीत समाविष्ट व्हावीत यासाठी शिक्षकांनी अधुन मधून सुचक कल्पना द्याव्यात प्रत्येक वेळेस अभ्यासक्रमानुसार अपेक्षीत संकल्पनाच विद्यार्थ्यांकडून येईल असे नाही. परंतू र्योय प्रश्नांच्या आधारे शिक्षक विद्यार्थ्यांना तिच्याकडे वळवू शकतात.
२:- माहितीचे अर्थ विवेचन
माहितीचे अर्थ लक्षात घेणे, अनुमान काढणे व समीकरण व सामाजीकरण करणे आणि यातून संकल्पनाप्राप्ती साध्य करणे या पाय-यांच्या समावेश होतो. वर्ग समिकरणाबाबत आणखी काय आढळते? पदांची संख्या किती आहे? वर्गसमिकरणाच्या डाव्या बाजूचे स्वरूप कोणत्या बैजिक राशीशी साम्य दर्शवते? या प्रश्नांच्या उत्तरातून समजते की, विद्यार्थ्यांनी संकल्पना प्राप्त झाली आहे किंवा नाही कार्य कारण संबंध शोधणे एकचल समीकरण आणी वर्ग समीकरण यांच्यात नेमका फरक काय आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी विद्यार्थ्यी समिकरणातील संबंधावर लक्ष केंद्रीत करतात अनुमान काढणे- एकचल समिकरण व वर्गसमिकरण समान व्यवहारीक परिस्थीतीसाठी मांडता येतात का? वर्ग समिकरणाची डावी बाजू वेगळ्या प्रकारे मांडता येईल का? वर्ग समिकरणाच्या उजव्या शुन्य ठेवण्याचा फायदा काय?
ज्ञान रचनावादातील कार्यनीती – मुक्त प्रश्न
ज्ञान रचनावादी अध्यापन पध्दतीत अनेक कार्यनीतीचा उपयोग केला जातो. ज्यापैकी मुक्त प्रश्न ही महत्वाची कार्यनीती होय. परंपरागत मुल्यमापन पध्दती बदलून विचारपुर्वक व मुक्त स्वरूपाचे प्रश्न विचारण्यावर राष्टÑीय अभ्यासक्रम आराखड्यात सुचविले आहे. मुक्त प्रश्न म्हणजे असे प्रश्न की, ज्या एकाच प्रश्नाला अनेक बरोबर उत्तर संभवतात असे प्रश्न परीक्षेत विचारले गेले तर विद्यार्थांच्या ज्ञानाचे खरे उपयोजन तपासता येईल. इयता नववीच्या बीजगणिताच्या पाहिल्याच प्रकरणात कोणतेही दोन संच जिल्हा असा प्रश्न विचारता येईल. येथे विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य आहे संच ही संकल्पना समजली आहे. किंवा नाही हे ही या प्रश्नावरून अजमावता येईल विद्यार्थ्यांनी लिहीलेली संच यादी पध्दतीने लिहिला किंवा गुणधर्म पध्दतीने लिहीला किंवा गुणधर्म पध्दतीने लिहीला तरी तो स्वीकारला पाहिजे उदा. कोटी ३ असणा-या बहुपदीला कोटी १ असणा-या बहुपदीने भागाकार करा. या उदाहरणात विद्यार्थ्यांने लिहिलेल्या कोणत्याही बहुपदी व त्यांच्या पध्दतीने केलेला भागाकार याचा गुण द्यायला हवेत. इयत्ता नववीच्या भुमितीत त्रिकोणाचे आणखी ेकाही गुणधर्म हे प्रकरण आहे. यात त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एक-संपाती असतात. त्रिकोणाचे कोणांचे दुभाजक एकसंपती असतात. त्रिकोणाचे शिरोलंब एक संपाती असतात. असे काही गुणधर्म समाविष्ट आहेत. त्या गुणधर्माच्या सिध्दता पाठ्यपुस्तकात दिलेल्या आहेत. याच गुणधर्माच्या बाबतीत आपण चांग ल्या प्रकारचे मुक्त प्रश्न विद्यार्थ्यांना विचारू शकतो.
उदा. कोणताही त्रिकोण काढा त्यांचे शिरोलंब काढा व त्यांच्या संपात बिंदुला नाव द्या. बहुतांशी विद्यार्थी कोणताही त्रिकोण काढा असे सांगितल्यावर समजून त्रिकोण काढतात त्यानंतर पुढची कृती करतात म्हणजे विचारलेल्या प्रश्नानुसार विद्यार्थ्यांनी ही कृती केली तर त्याला गुण द्यायला हवते. मुक्त प्रश्नातुन विद्यार्थ्यांच्या अनेक क्षमता तपासता येतील फक्त शिक्षकांची मानसिक तयारी व्हायला हवी.
शिक्षकांच्या भुमीकेत बदल
पारंपारीक शिक्षणातील शिक्षणातील शिक्षकाची भुमिका ज्ञानरचनावादात पुर्णपणे बदलेली आहे. विद्यार्थी केंद्रीत अध्यापन पध्दती, कार्यनीती वापरताना ही शिक्षक हा हुकूमशहासारखा वागताना दिसतो. ज्ञानरचनावादात असा शिक्षक नाकारला आहे. केवळ मी, अवघा मी, शेवटचा मी, मी आणि मीच….’ या वृत्तीस ज्ञानरचनावादात स्थान नाही. ज्ञान रचनावादातील शिक्षक हा मार्गदर्शक, सुविधादाता, संघटक आहे. यात शिक्षकास ज्ञान या संकल्पनेचा विस्तार समजावून घ्यावा लागणार आहे. ज्ञानाला ध्येय आहे, याची जाणीव स्वत:ला व विद्यार्थ्यांना करून द्यावी लागणार आहे.
प्रबलन व प्रेरणा
पारंपारीक शिक्षक प्रक्रियेत बाह्य प्रेरणाही महत्वपुर्ण होती. ज्ञानरचनावादानुसार शिक्षकांने विद्यार्थ्यांच्या उत्तरास चुक असे ही म्हणजे अपेक्षित नाही. कारण त्यामूळे विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया खंडीत होते म्हणून जरी विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले तरी अधिकाअधिक सकारात्मक प्रबलन देत ते उत्तर करून घ्यावे. ज्ञानग्रहणाच्या आंतरीक प्रेरणेवर शिक्षकांने भर घावा. शिक्षण प्रक्रियेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्या भुमिका बदलल्या आहेत. ज्ञाननिर्मिती, ज्ञानग्रहण ज्ञानप्रसार व ज्ञानसुरक्षेतून ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी ज्ञानरचनावाद स्वीकारावा लागेल आणि तो स्वीकारला ही आहे आता या ज्ञानरचनावादांच्या यशस्वीचे उत्तरदायित्व तुम्हा-आम्हावर आहे…..!