वनविभागाच्या तळ्याचे जलपूजन

0
15

गोरेगाव : तालुक्यातील नोनीटोला शेतशिवारातील चिल्हाटी वनपरिक्षेत्रात यावर्षी जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत पडीक जमिनीमध्ये तयार केलेल्या तळ्यातील संकलित जलाचे पूजन तहसीलदार कल्याणकुमार डहाट, पं.स.सभापती दिलीप चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वनक्षेत्राधिकारी एस.एम.जाधव, क्षेत्रसहायक आग्रे, वनरक्षक बिसेन, वनरक्षक उदापुरे व वनमजूर उपस्थित होते. वनविभागाच्या वतीने पावसाळी पाण्याचे जतन करून शेतशिवार व गावशिवारात पाण्याचा साठा वाढवण्यासाठी जलयुक्त शिवार कार्यक्रमांतर्गत गोरेगाव वनक्षेत्राधिकारी एस.एम.जाधव यांनी चिल्हाटी वनक्षेत्राची निवड करून तेथील २५ हेक्टर जमिनीवर ३५ मिटर अंतराने अनेक नाल्या खोदून बांध टाकल्याने क्षेत्रात आज मोठय़ा प्रमाणात पाण्याचा संचय दिसून येत आहे. जमिनीच्या खालच्या बाजूला ३५मिटर बाय ३५मिटर बाय ३५मिटर खोलीचे तळे बनवून मोठय़ा प्रमाणात पाणी संचयीत करण्यात आले. या पाण्याचा उपयोग क्षेत्रातील शेतीसाठी व जंगल प्राण्याची तहान भागवण्यासाठी नक्कीच होणार आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार कार्यक्रम शेतकर्‍यांना फायदेशीर ठरणार आहे.