नागपूर ग्रामीण आरटीओमध्ये ४६ पदे रिक्त

0
12

नागपूर,दि.21- विभागात दरवर्षी हजारो वाहनांची भर पडते. कामाचा व्यापही वाढतो मात्र आरटीओतील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरलीच जात नाही. परिणामी, कामाची गती मंदावते. याचा फटका कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्यांना बसतो. सद्यस्थितीत नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अशा विचित्र कात्रीत सापडले आहे.सर्वात जास्त महसूल गोळा करणाऱ्या नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयात ४६ पदे रिक्त आहेत. कार्यालयात ११९ पदे मंजूर असताना केवळ ७३ पदे भरण्यात आली आहेत. विशेषत: सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची तीन पदे, मोटार वाहन निरीक्षकाचे सात तर सहायक मोटार वाहन निरीक्षकाची १० पदे रिक्त आहेत. परिवहन विभागाने या कार्यालयासाठी सहायक मोटार वाहन निरीक्षकांच्या १० वाढीव पदांना मंजुरी दिली होती, परंतु महिना होत नाही तोच नऊ पदे कमी केली. परिणामी, कामाचा ताण वाढला असून प्रलंबित कामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.