आंदोलनाला युवा स्वाभिमानचा पाठिंबा; भीक मांगो आंदोलन करणार

0
9

गोंदिया,दि.२१(बेरारटाईम्स) -जिल्हा सामान्य कुवर तिलकqसह रुग्णालय व बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या विविध समस्यांना घेऊन गेल्या १४ ऑगस्ट पासून सुरू असलेल्या वसंत ठाकूर यांच्या आंदोलनाला आज रविवारला युवा स्वाभिमान संघटनेने पाqठबा जाहीर केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष जितेश राणे,वाय.पी.येळे,टोनेश हरिणखेडे,विनोद गौतम,मनोज बिसेन,अरqवद टेंभरे,भरत शरणागत,राजेंद्र पटले,जीवनलाल कुकडे,जगदीश रहागंडाले,कमल राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.गेल्या ७ दिवसापासून हे आंदोलन सुरू असून उद्या २२ ऑगस्टपासून युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने शहरात भीक मांगो आंदोलन करून गोळा झालेली रक्कम आरोग्यमंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार असल्याची माहिती युवा स्वाभीमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी बेरार टाईम्सला दिली.
गेल्या सात दिवसापासून गोंदिया शहरातील कुवरतिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालय व बाई गंगाबाई महिला सामान्य रुग्णालयातील अव्यवस्थेला घेऊन सामाजिक कार्यकर्ता बसंत ठाकूर यांनी बेमुदत आंदोलनाला सुरवात केली आहे.ठाकूर यांनी आपल्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी स्वतः व आंदोलनाला बसलेल्या कार्यकत्र्यासह मुंडण करून शासनाच्या व आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणाचा निषेध नोंदविला.१४ ऑगस्टपासून सुरू या आंदोलनाला जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले,खासदार नाना पटोले यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांचे सहकारी म्हणून मुकेश शिवहरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाèयानी भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला पाqठबा दिला.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पातुरकर व वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ.अजय केवलिया यांनीही त्यांच्या मागण्या आरोग्य विभागाकडे पोचवून त्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले परंतु जोपर्यंत आरोग्य मंत्री स्वतः रुग्णालयातील समस्या सोडविण्यासंबधीचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय ठाकूर यांनी घेतला आहे.आता त्यांच्या आंदोलनाला युवा स्वाभिमान संघटनेने सुद्धा पाqठबा दिला आहे.