चित्रा कापसे/तिरोडा-स्थानिक रेल्वे स्थानकावर डाउन लाइनवरील प्लॅटफॉर्मवर एकही तिकीट काउंटर नसल्याने नागरिकांना त्रास होत असून तेथे तिकीट काउंटरची व्यवस्था करण्यात यावे या नागरिकांच्या मागणीवर जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी यांनी रेल्वेस्थानक अधिकारीमार्फत विभागीय रेल्वे प्रबंधकांना निवेदन पाठविले आहे.
येथील रेल्वे स्थानकावरील डाउन लाइनवरील प्लॅटफॉर्मवरवर तिकीट काउंटर उपलब्ध नाही. त्यामुळे डाउन लाइन प्लॅटफॉर्मवरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. अपलाइनवर दोन तिकीट काउंटर आहेत. परंतु, डाउन लाइनवर एकही तिकीट काउंटर उपलब्ध नाही.डाउन लाइनवरून पुलावरून चढावे लागते. चढताना अनेक वेळा गाडी चुकते. त्यातही ज्येष्ठ नागरिकांना चढताना खूप त्रास सहन करावा लागतो. कवलेवाडा परिसरातील १० ते १५ गावांतील प्रवासी डाउन लाइन प्लॅटफॉर्मवरून दररोज ये जा करतात व त्यांना तिकीट काढण्यासाठी पुल ओलांडन तिकीट
काढायला जावे लागते. करीता डाउन लाइन प्लॅटफॉर्मवर तिकीट काउंटरची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. निवेदन जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी पिंटू चौधरी, सरपंच तुरेंद्र नागपुरे, माजी सरपंच भोजलाल नागपुरे, मोरेश्वरजी नागपुरे, सरपंच महेश लिल्हारे. योगेश टेभरे उपस्थित होते.





