23.9 C
Gondiā
Friday, July 31, 2026
Home विदर्भ आमदार रहांगडालेंच्या हस्ते सेवा पंधरवाडा अंतर्गत अतिक्रमणधारक लाभार्थ्यांना पट्टे वाटप

आमदार रहांगडालेंच्या हस्ते सेवा पंधरवाडा अंतर्गत अतिक्रमणधारक लाभार्थ्यांना पट्टे वाटप

0
42

तिरोडा,दि.०१ः सेवा पंधरवाडा अभियानाअंतर्गत तहसील कार्यालय, तिरोडा येथे आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये आबादी जागेवर वास्तव्यास असलेल्या अतिक्रमणधारकांना शासनाच्या नियमांनुसार निशुल्क पट्टे आमदार विजय रहागंडाले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे अनेक गरजू वंचित कुटुंबांना त्यांच्या निवासस्थानाचे कायदेशीर हक्क प्राप्त झाले असून त्यांना सुरक्षिततेची हमी मिळाली आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला आहे. यामध्ये प्रामुख्याने चिरेखणी येथील ८, पालडोंगरी येथील १, जमुनिया येथील १ व एडमाकोट येथील १,पिपरिया येथील १ अशा एकूण १२ लाभार्थ्यांचा समावेश असून १२ लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर पांदन रस्त्यांना नंबर देण्याबाबत आमदार रहागंडालेनी यांनी सुचना दिल्या.तालुक्यात एकूण १२४४ पांदन रस्ते असून ९१९ पांदन रस्त्यांचा नकाक्षावर समावेश आहे.तसेच ३२२ पांदन रस्त्याची शिवारफेरी अंतर्गत नोंद करण्यात आल्याची माहिती दिली. कार्यक्रमास जि.प.समाजकल्याण सभापती रजनी कुंभरे,जि.प.सदस्या एड.माधुरी रहांगडाले,किरण पारधी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जितेंद्र रहांगडाले, उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार नारायण ठाकरे, कृउबास संचालक मिलिंद कुंभरे व लाभार्थी उपस्थित होते.