शास्त्री वॉर्ड ओबीसी संघर्ष समिती अध्यक्षपदी खुशाल कटरे, कार्याध्यक्ष प्रा.गहाणे, तर सचिव बंशीधर शहारे

0
10

गोंदिया: गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने शास्त्री वॉर्ड गोंदिया येथील रामकृष्ण गौतम यांच्या निवासस्थानी रविवारला घेण्यात आलेल्या बैठकीत शास्त्री वॉर्ड ओबीसी संघर्ष कृती समितीची कार्यकारिणी गठित करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे होते. यावेळी कार्याध्यक्ष अमर वèहाडे, उपाध्यक्ष मनोज मेंढे, संघटक कैलास भेलावे, संयोजक खेमेंद्र कटरे, शिशिर कटरे, सावन डोये,डी.डी. पटले उपस्थित होते. यावेळी शास्त्री वॉर्ड ओबीसी कृती समितीच्या अध्यक्षपदी प्रा.खुशाल कटरे, कार्याध्यक्षपदी प्रा. रामलाल गहाणे व सचिव पदावर बंसीधर शहारे यांची निवड करण्यात आली. कोशाध्यक्ष पदी बी.डब्ल्यू.कटरे व ओमप्रकाश शेंडे, सहसचिव यशवंत भगत व अरुणराव रहमतकर, उपाध्यक्षपदी एस.यू.वंजारी, व कृष्णकुमार लिल्हारे, प्रसिद्धी प्रमुख म्हणून गजानन तरोणे व विजय मुनेश्वर, तर सदस्यांमध्ये छत्रपती कटरे, रामकृष्ण गौतम, खोमराज बिसेन, वाय.डी. पटले, मुरेश्वर बडवाईक, विनोद चौधरी, संतोष वैद्य, दिवाकर बिसेन, राजेश कापसे, सुनील भोंगाडे, भाऊराव नागमोती, गोविंद बुरडे, पद्माकर गायधने, पी.वाय.ठाकरे, तेजराम पारधी यांचा समावेश आहे. तर सल्लागार समितीमध्ये सेवानिवृत्त तहसीलदार भरत पाटील, सेवानिवृत्त एएसआय भिवाजी खुने, राधेश्याम करंजेकर, सुरेश गायधने, सेवानिवृत्त अभियंता झेड.पी. रहांगडाले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जी.आर. उरकुडे, अनिल टेंभरे व डॉ. रुपसेन बघेले यांचा समावेश आहे. या बैठकीत अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासह विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पुढच्या बैठकीत महिला ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी विद्यार्थी संगठना गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोबतच कोपर्डी घटनेसह इतर मागण्यांचे निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. यावेळी योगानंद पटले, धनेंद्र चव्हाण, मनोज रहांगडाले, जीवन शरणागत आदी मान्यवर उपस्थित होते.