कोपर्डीसह विविध मुद्यावर ओबीसी संघर्षसमितीचे निवेदन

0
11

गोंदिया,दि.8- गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व शास्त्री वॉर्ड ओबीसी कृती संघर्ष समितीच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी घटनेचा निषेध नोंदविणारे निवेदन मु्ख्यमंत्र्याचे नावे उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत पाठविण्यात आले.नायब तहसिलदार वाहने यांनी ओबीसी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळसोबत सविस्तर चर्चा करुन निवेदन लगेच मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्याचे आश्वासन दिले.
या निवेदनात कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करुन पिडित कुटुबांना न्याय व सुरक्षा देण्यात यावे,.पुरोगामी महाराष्ट्रात कोपर्डी सारख्य़ा घटना काळीमा फासणार्या असल्याने याप्रकरणात आरोपी कुणीही असो त्यास कुठल्याच प्रकारचे सरंक्षण न देता अशा घटनांवर आळा घालण्यासाठी त्वरीत कारवाईची मागणी करण्यात आली.तसेच गेल्या अनेक दिवसापासून राज्यात ओबीसी समाजावर अन्याय करणार्या घटनामध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ओबीसी समाजात एकप्रकारे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच ओबीसी समाजातील व्यक्तींना खोट्या गुन्ह्यात अडकविणार्यावर सुध्दा कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.सोबतच गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे संघटक राजेश नागरीकर याच्यावर झालेल्या हल्याप्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावे. भाजप ओबीसी आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड.मुकेश रहागंडाले यांचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावे अादी मागण्यासह नंदुरबार येथील उपविभागीय अधिकारी यांनी सुनिल विठोबा चौध़री यांना नॉनक्रिमिलेयमर प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर निलबंनाची कारवाई करण्यात यावी.तसेच केंद्रसरकारप्रमाणे क्रिमिलेयरची मर्यादा नाॅन क्रिमिलेयरला राज्यात लागू करण्यात यावे या मागणीचा समावेश होता.निवेदन देतेवेळी कार्याध्य़क्ष अमर वराडे,सयोंजक खेमेंद्र कटरे,संघटक कैलास भेलावे,शास्त्री वार्ड अध्यक्ष खुशाल कटरे,कार्याध्यक्ष प्रा.रामलाल गहाणे,भारत पाटील,प्रमेलाल गायधने,आर.के.कारंजेकर,बंशीधर शहारे,शिशिर कटरे,रामकृष्म गौतम,डाॅ.संजीव रहागंडाले,राजेश कापरे,ओमप्रकाश सपाटे,महेंद्र बिसेन,संजय राऊत आदी उपस्थित होते.