तीन दिवसीय शंकरपटात लाखोंच्या बक्षिसांचे वितरण
गोरेगाव_ तालुक्यातील सटवा येथील भव्य पटांगणावर दिनांक २५, २६ व २७ ऑक्टोबर रोजी आयोजित बिन तुतारी शंकरपटात नागपूरसह विदर्भातील तीनशेच्या वर बैलजोडींनी सहभाग नोंदविला. समितीच्या वतीने लाखोंच्या बक्षिसाचे वितरण करण्यात आले असून तीन दिवसीय या शंकरपटात हजारो पटप्रेमींनी उपस्थिती दर्शविल्याने गावाला जत्रेचे स्वरुप आले होते.
दिनांक २५ ऑक्टोबर रोजी शंकरपटाचे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे यांच्या हस्ते पंचायत समिती सभापती चित्रकलाताई चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सरपंच अर्चना रमेश ठाकूर, पोलीस पाटील टिकाराम रहांगडाले, तंटामुक्त समिती अध्यक्ष रवींद्र कटरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक महेंद्र ठाकूर, सेवा सहकारी अध्यक्ष डॉ. के. टी. कटरे, देवकांत ठाकूर, कन्हैयालाल कोल्हे, से.नि.शिक्षक चंद्रशेखर कटरे, भोजराज कटरे, टिकाराम पारधी, ग्रा.प.सदस्या रामबत्ता रहांगडाले, उदेलाल रहांगडाले, इंद्रराज बघेले, उमराव रहांगडाले, उमराव कडुकार, चंदशेखर भगत, देवराज कोल्हे, भोजराज बघेले, दिलीप रहांगडाले, गिरधारी कोल्हे, श्रीपत बोंडने आदी उपस्थित होते.
दिनांक २७ ऑक्टोबर रोजी शंकरपटाचे बक्षीस वितरण कार्यक्रम जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कटरे यांच्या अध्यक्षतखाली राष्ट्रवादी काँग्रस तालुकाध्यक्ष केवलराम बघेले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बक्षीस वितरक म्हणून माजी सरपंच विनोद पारधी, माजी सरपंच रमेश ठाकूर, क्षत्रिय पवार महासभेचे सहसचिव भागचंद्र रहांगडाले, ग्रामीण पोलिस ठाण्याचे शेखर खोब्रागडे, बिपेंद्र ठाकूर, पटसमिती अध्यक्ष महेश बघेले, ग्रा.पं. सदस्य ओमेन्द्र ठाकूर, संजय कटरे, शंकर राणे यांच्यासह क्रमांक १ व २ चे जांडीमालक नंदूभाजु रहांगडाले बरली (भंडारा), रामलाल कटरे (नागपूर) आदी उपस्थित होते. प्रथम बक्षीस 41 हजार रुपये तर द्वितीय 31 हजार रुपये होते. कार्यक्रमाचे संचालन नितीन कटरे यांनी तर आभार मयूर कोल्हे यांनी केले.
यशस्वी आयोजनाकरिता अध्यक्ष महेश बघेले, जितेंद्र चौधरी, ओमप्रकाश चौधरी, चंद्रकांत ठाकूर, चैनलाल राणे, रवींद्र रहांगडाले, लोकेश बघेले, ओंकार रहांगडाले, संतोष पारधी, ताराचंद कुंभरे, शिवदयाल कटरे, महेंद्र पटले, किसन ठाकूर, प्रकाश बघेले, नरेंद्र बघेले, डिलेंद्र कटरे, कुलदीप वैद्य, सुनील ठाकूर, हितेंद्र कटरे,अश्वीन ठाकूर, मृणाल रहांगडाले, हितंद्र रहांगडाले, गिरधारी ठाकूर, जगजीवन ठाकूर, राजेश रहांगडाले, महेंद्र बोडणे, सुभाष ठाकूर, अंकित बोडणे, विजय भगत, भूपेंद्र रहांगडाले, खेमेंद्र रहांगडाले, हितेंद चौधरी, योगराज पटले, रवी चौधरी, देबिलाल बघेले, गुणेश कटरे, राजेंद्र रहांगडाले, रुपेंद्र रहांगडाले आदींनी सहकार्य केले.





