27.3 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद

अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद

0
455
file photo

तिरोडा :- तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) परिसरात ९ जानेवारी रोजी घडलेल्या दुःखद घटनेनंतर नरभक्षक बिबट्याची दहशत पसरली होती.खडकी, डोंगरगाव, निमगाव, बुचाटोला आणि रुस्तमपूर ही गावे घनदाट जंगलांनी वेढलेली असल्याने बिबट व वाघाच्या भितीने पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे बंद केले होते.तसेच शेतकरीही शेतपरिसरात जायला घाबरायचे,त्यामुळे वनविभागाने बिबट्याला पकडण्याकरीता ४ विविध ठिकाणी पिंजरे लावले होते.यापैकी खडकी परिसरातील तलावाशेजारी पिंजर्यात बिबट्याला आज १७ जानेवारीला सायकांळच्या सुमारास जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

आज पहाटे डोंगरगाव येथील परमानंद भगत यांच्या घराच्या अंगणात शिरून या बिबट्याने बैलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. शाळेत तळ ठोकून असलेल्या वनविभागाच्या पथकाने तातडीने बिबट्याचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. बिबट्या खडकी डोंगरगाव शिवारात असल्याचे लक्षात येताच, वनविभागाच्या तज्ज्ञ नेमबाजांनी त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन (Dart) मारले. इंजेक्शन लागल्यानंतर काही वेळातच बिबट्या शांत झाला आणि त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.

blank