28.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home विदर्भ चंद्रपूर गडचिरोली महामार्गावरील अपघातग्रस्त रुग्णांची आ.वड्डेटीवारांनी घेतली भेट!

चंद्रपूर गडचिरोली महामार्गावरील अपघातग्रस्त रुग्णांची आ.वड्डेटीवारांनी घेतली भेट!

0
31
कठीण प्रसंगी रुग्णांना काँग्रेसचा आधाराचा हात…
सावली- तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील हिरापूर टोल नाक्याजवळ आज दुपारी भीषण अपघात घडला. यात ब्रम्हपुरी मतदारसंघातील अनेकांचा समावेश असल्याची माहिती मिळताच अपघातात जखमी झालेल्या रुग्णांची रुग्णालयात जाऊन विधानसभेतील काँग्रेसचे नेते आमदार विजय वड्डेटीवार यांनी भेट घेतली.उपचार सुरू असलेल्या रुग्णांची चौकशी करत त्यांना धीर दिला.
आज घडलेल्या या अपघातात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील अनेक नागरिकांचा समावेश आहे. डॉक्टरांकडून उपचारांची सविस्तर माहिती घेताना रुग्णांना सर्वोत्तम उपचार मिळालेच पाहिजे अशा सूचना आ.वड्डेटीवारांनी दिल्या. कुणालाही आर्थिक, प्रशासकीय किंवा वैद्यकीय अडचण भासू नये, यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आश्वासन दिले. तसेच अपघातात काही गंभीर जखमी रुग्णांना नागपूर येथील मेडिकल कॉलेज तथा एम्स रुग्णालयात पुढील उपचाराकरिता तात्काळ पाठवण्याची व्यवस्था केली. अपघातामुळे हादरलेल्या कुटुंबीयांशी संवाद साधून आधार दिला. या भेटीमुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला.