25 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व.जयंती अध्यक्षपदी अरविंद भावे यांची वर्णी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व.जयंती अध्यक्षपदी अरविंद भावे यांची वर्णी

0
30

मावळते अध्यक्ष टेम्भूरकर यांनी सादर केला रू. 12 लाख 65 हजाराचा जमाखर्च

4 दावेदरांची भावेंच्या समर्थनार्थ माघार.
गोंदिया ता. 27 जानेवारी:– डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2026 च्या अध्यक्षपदी अरविंद भावे यांची निवड झाली आहे.श्री भावे हे येथील IDBI बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत.दरम्यान मावळते अध्यक्ष टेम्भूरकर यांनी मागील जयंतीचा जमाखर्च सादर करून रुपये 12 लाख 65 हजार खर्च झाल्याचे सांगून पैकी स्पर्धा परीक्षेसाठी सुमारे 80 हजार खर्च करण्यात आल्याचे सांगितले.
गोंदियाच्या रिंगरोडवरील अशोक कांबळेच्या कार्यालय परिसरात 26 जानेवारी रोजी जयंती समितीच्या सभेत अध्यक्ष पदासाठीची निवड करण्यात आली आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंतीचे माजी अध्यक्ष तथा GDCC बँकेचे माजी महाव्यवस्थापक विलास वासनिक हे होते. मंचावर निवर्तमान अध्यक्ष अनंत टेम्भूरकर,नरेंद्र मेश्राम (NL ),सुनील भरणे,श्रीमती पौर्णिमा रंगारी, श्लेषा लाडे, वीणा चव्हाण, नानाजी शेंडे, श्री तांडेकर, अशोक कांबळे, श्री देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.
ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. अध्यक्ष पदासाठी अरविंद भावे,सुनील मेश्राम, जोगेंद्र गजभिये, एन. एल. मेश्राम आणि पंकज नागदवने यांच्या नावाला कार्यकर्त्यांकडून अनुमोदीत करण्यात आलं.परंतु उपरोक्त चौघानी आपले जाहिर समर्थन श्री भावे यांना दिल्यामुळे त्यांना चांगलाच पाठबळ मिळाला आणि सर्वानुमते श्री भावे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली.ही घोषना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वासनिक यांनी केली.दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी श्री भावे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
दरम्यान त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं.कार्यक्रमाचे संचालन सुनील मेश्राम यांनी केले तर आभार पृथ्वीराज कोल्हटकर यांनी मानले.दरम्यान नवनिर्वचित अध्यक्ष श्री भावे यांच्यासह सर्वच कार्यककर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केलं. फटाक्याच्या लड्या फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. आपले मनोगत व्यक्त करतांना याप्रसंगी श्री भावे म्हणाले की, माझ्या आयुष्यात मी कित्यकदा बाबासाहेबांना अभिवादन केले असले परंतु जयंती समितीचा अध्यक्ष म्हणून अभिवादन करतांना मला मिळालेला समाधान हा काही और आहे. असे बोलून दाखविले.