कट्टीपार डिजीटल शाळेवर दुकानदाराची जप्ती

0
9
महेश मेश्राम
आमगाव दि.19: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कट्टीपार येथे लोकवर्गीणीचा निधी कमी पडला. त्यामुळे डिजिटल शाळेचे साहित्य उधारीवर खरेदी केले. मात्र, दुकानदाराची उधारी फेडली नाही. त्यामुळे दुकानदाराने साहित्य परत नेले. तर शाळा डिजिटल करण्याकरिता गोळा झालेल्या निधीची अफरातफर केल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीने लोकवर्गणीतून २१ मे २०१६ रोजी संगणक साहित्य, प्रोजेक्टर व इतर साहित्य पंचावन्न हजार सहाशे रुपयांची खरेदी केली. या उधारी खरेदी साहित्याचे पंधराहजार रुपये दुकानदाराला अदा करण्यात आले. परंतु, उर्वरित रक्कम अदा करण्यासाठी जुळवाजळव करण्यात आली नाही. त्यामुळे डिजीटल शाळेकरिता घेण्यात आलेले साहित्य दुकानदाराने परत घेतले. सदरशाळेतशासनाच्यावतीने निधी उपलब्ध करून शाळा डिजिटल करण्यासाठी साहित्य खरेदी करण्याकरिता पंचावन्न हजार ५८२ रुपये जिल्हा परिषदेने मंजूर केला. या निधींतर्गत शळा डिजिटल करण्यासाठी साहित्य करण्याची प्रकिया उपविभागीय सार्वजनिक बांधकाम अधिकारी कार्यालयाकडे देण्यात आली. मात्र, साहित्य पुरवठा करणाºया कंत्राटदाराने उधारीवर साहित्य खरेदी केले.मात्र पैसे दुकानदाराला दिले नाही. शासनाकडून मात्र निधीची उचलकेली. त्यामुळे शासनाच्या निधीची अफरातफर झाल्याचा संशय आल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने हिशेब तपासणी केली असता निधीची अफरातफर झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकाने अफरातफर केल्यापÑकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली.