26.6 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ कायाकल्प योजना; जिल्ह्यातील १ ४ आरोग्य संस्थाचे मुल्यांकन

कायाकल्प योजना; जिल्ह्यातील १ ४ आरोग्य संस्थाचे मुल्यांकन

0
51

गोंदिया : ‘कायाकल्प’ योजना ही सार्वजनिक आरोग्य सुविधांचे मूल्यांकन करण्याची सुधारीत नविन निरतंन प्रक्रिया आहे. हे मूल्यांकन एका चेकलिस्टवर आधारित आहे. दरम्यान राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम अंतर्गत कायाकल्प योजनेतून जिल्ह्यातील आरोग्य संस्थेची आरोग्य सुविधा व गुणवत्ता सुधारण्याच्या अनुषंगाने २६ व २७ फेब्रुवारी रोजी गुणवत्ता आश्वासन संनियंत्रण भंडारा व नागपूर राज्यस्तरीय चमूने जिल्ह्यातील १४ आरोग्य संस्थेचे मुल्यांकन केले. मूल्यांकांतर्गत राज्यस्तरीय अधिकारी व टिमने उपकेंद्र पाहणी, दस्तऐवज तपासणी आणि कर्मचाऱ्यांची मुलाखत घेण्यात आली आणि शेवटी मूल्यांकनात प्राप्त त्रुटींची पूर्तता करण्याबाबत सुचना दिल्या.
आरोग्य संस्थेतील गुणवत्ता वाढविणे हे एक टिम वर्क असुन एकमेकांच्या सहकार्याने गुणवत्ता साध्य होत असल्याची माहीती सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांनी दिली आहे. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी, समुदाय
आरोग्य अधिकारी, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, स्वच्छक, परिचर, आशा सेविका हे विविध रेकॉर्ड व रजिष्टर्स अद्यावत करून रुग्णालय सुविधा व स्वच्छता ठेवुन लोकांना आरोग्य सेवा देत असतात.
जिल्हा गुणवता आश्वासन कार्यक्रमांतर्गत कायकल्प उपक्रमात २६ फेब्रुवारी रोजी भंडारा टीमने सात आरोग्य संस्था त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र रावणवाडी,दवनीवाडा, एकोडी, मोरवाही, खमारी, दरेकर विकावराबांधतसेच २७ फेब्रुवारी रोजी सहा आरोग्य संस्था त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली, कवलेवाडा, सोनी, चोपा, कुर्हाडी व सुकडी/डाक तसेच नागपुर टीमने पीएचसी बनगाव येथे भेट देवुन मुल्यांकन केले. मूल्यांकांतर्गत राज्यस्तरीय अधिकारी व टिमने उपकेंद्र पाहणी, दस्तऐवज तपासणी आणि कर्मचाऱ्यांची मुलाखत घेण्यात आली आणि शेवटी मूल्यांकनात प्राप्त त्रुटींची पूर्तता करण्याबाबत सुचना दिल्या. यावेळी तालुका आरोग्य अधिाकरी, आरोग्य संस्थेचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, स्वच्छक, परिचर प्रामुख्याने उपस्थित होते.
मूल्यांकनाचे निकष
रुग्णालय/सुविधा देखभाल, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण, समर्थन सेवा, स्वच्छता प्रोत्साहन, मूल्यांकनाचा निकाल काय आहे. मूल्यांकनात ७० टक्के आणि त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या आरोग्य संस्था सुविधा कायाकल्प पुरस्कार किंवा प्रमाणपत्रासाठी निवडल्या जातात.
कायाकल्प योजनेचे मार्गदर्शक तत्वे
रुग्णालयांची देखभाल आणि सुविधा सुधारणे, पायाभूत सुविधांची देखभाल करणे, रुग्णालयीन स्वच्छता आणि स्वच्छता व्यवस्थापन सुधारणे, सुका आणि ओला कचरा व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण व्यवस्थापन, यवस्थापन, आरोग्य सेवा सहाय्य, स्वच्छतेचा प्रचार करणे.

blank