साकोली,दि.१२मार्च-तालुक्यातील खैरी,बलमाझरी ग्रामपंचायतीने १०० टक्के पाणीपट्टी वसुली करून आदर्श निर्माण केला आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय जल महोत्सव कार्यक्रमासाठी सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रीय जलजीवन मिशनच्यावतीने ८ ते २२ मार्च या कालावधीत देशभरात ‘जल महोत्सव प पंधरवडा’ साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी दिल्ली येथील विज्ञान भवनात भारताच्या राष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष सोहळा पार पडला. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने सहा विविध वर्गवारींमध्ये नामांकने मागविण्यात आली होती. राज्यातील १२ गावांची निवड करून प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आले होते. यामध्ये १०० टक्के पाणीपट्टी वसुलीद्वारे आर्थिक शाश्वतता साधणारे गाव म्हणून वलमाझरीची निवड करण्यात आली आहे.खैरी वलमाझरी गट ग्रामपंचायतीमध्ये खैरी,वलमाझरी, आमगाव आणि पिटेझरी या गावांचा समावेश होतो.
पाणीपुरवठा योजनेची प्रभावी अंमलबजावणी
सरपंच रूखमोडे यांच्या नेतृत्वाखाली न ळ पाणीपुरवठा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आ हे नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी ग्रामपंचायतीने विमानातून सहल, नागझिरा पर्यटन आणि शुद्ध पाण्याची सुविधा यासारखे उपक्रम राबवले. यामुळे २०२१ पासून गावात नियमित १०० टक्के पाणीपट्टी वसुली होत आहे. या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे, प्रकल्प संचालक माणिक चव्हाण आणि कार्यकारी अभियंता हितेश खोब्रागडे यांनी सरपंच आणि ग्रामस्थांचे कौतुक केले.





