25.1 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home Top News इंडिगोची गोंदिया-हैद्राबाद विमानसेवा १ मेपासून बंद होणार?

इंडिगोची गोंदिया-हैद्राबाद विमानसेवा १ मेपासून बंद होणार?

0
359
खेमेंद्र कटरे/गोंदिया,१२ मार्च : गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून थेट हैदराबादसाठी गोंदिया-हैदराबाद विमान सेवा १ डिसेंबर २०२३ रोजी इंडिगो कंपनीद्वारे अधिकृतपणे सुरू करण्यात आलेली विमानसेवा गेल्या दोन वर्षापासून नियमित आहे.मात्र यातच नियमित असलेली गोंदिया हैद्राबाद-गोंंदिया विमानसेवेला मात्र ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सध्याच्या घडीला इंडिगोच्यावतीने एप्रिल २०२६पर्यंत गोंदिया हैद्राबाद विमानाचे बुकिंग लाॅट कायम ठेवले असले तरी १ मे २०२६ पासून या मार्गावरील बुंकीग बंद केल्याने गोंदिया-हैद्राबाद विमानसेवा बंद पडते की काय अशा शंका व्यक्त केल्या जात आहेत.दरम्यान बिरसी विमानतळाचे व्यवस्थापक गिरीशचंद्र वर्मा यांना विचारणा केले असता विमानतळ प्राधिकरणाकडे विमानसेवा बंद करण्यासंदर्भात कंपनीकडूव अधिकृत असे कळविण्यात आले नसल्याचे सांगतिले.

तर गोंदिया- इंदुर ही स्टार एयरची सेवा १६ सप्टेंबर २०२५ पासून सुरु झालेली असून गोंदिया ते इंदूर मार्गावर सुरू आहे.स्टार एयरने ही सेवा १५ जानेवारी २०२६ पासून ही सेवा मुंबई व बंगळूर शहराशी जोडली आहे.ही विमानसेवा आठवड्यातून काही विशिष्ट दिवशी (मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार) उपलब्ध आहे, जी बिरसी विमानतळावरून इंदूर आणि पुढे बंगळुरूपर्यंत चालते.यापुर्वी फ्लायबिग कंपनीने  गोंदिया ते हैदराबाद आणि इंदूरची विमानसेवा सुरू केली होती.मात्र, फ्लायबिग एअरलाइन्सने सुरू केलेली ही विमानसेवा २१ ऑगस्ट २०२३ पासून बंद झाली.त्यानंतर इंडिगो कंपनीने गोंदियाच्या विमानतळावरुन विमानसेवा सुरु केली असून आजपर्यंत हजारो प्रवाश्यांनी या विमानतळावरुन प्रवास केला आहे.

या जिल्ह्यांनाही लाभ
गोंदिया येथून विमानसेवा सुरू झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील नागरिकच नव्हे तर शेजारील बालाघाट, सिवनी, राजनांदगाव आदी जिल्ह्यातील व्यापारी, अधिकारी व नागरिकांना मोठ्या प्रमाणात विमान प्रवासाचा लाभ होत आहे. बिरसी विमानतळावर हैदराबाद आणि इंदोरला जात होते. त्यातच गोंदियाला दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, पुणे, बंगळुरू आदी मेट्रो शहरांच्या विमानसेवेची भेट मिळेल, अशी अपेक्षा होती, परंतु आता यावरही संभ्रम निर्माण झाले आहे.

विमानतळावर नाईट लॅंडीगची सोय
विमानांच्या उतरणी आणि उड्डाणासाठी विमानतळावर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम (ILS) बसवण्यात आले आहे. यामुळे विमाने दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी विमानतळावर उतरू शकतील अशी सुविधा गोंदियाच्या बिरसी विमानतळावर उपलब्ध झालेली आहे. होती.परंतु कोविड-१९ साथीच्या काळात, ही प्रणाली काढून टाकण्यात आली आणि मंगळूर येथील विमानतळावर बसवण्यात आली, ज्यामुळे बिरसी विमानतळावर रात्रीच्या विमानांच्या लँडिंगमध्ये अडथळा निर्माण झालेला होता.आता, अंदाजे ६ कोटी खर्चून, गोंदियाच्या बिरसी विमानतळावर ही प्रणाली पुन्हा बसवण्यात आली आहे.ही प्रणाली बसविल्यानंतरच गोंदिया इंदुर हि विमानसेवा सायकांळच्यावेळेस प्रारंभ झाली आहे.

४ वर्षापुर्वी सुरु झाली होती प्रवाशी विमानसेवा
गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून तब्ब्ल ७९ वर्षानंतर १३ मार्च २०२२ रोजी इंदुर-गोंदिया -हैद्राबाद या प्रवाशी वाहतूक विमान सेवेला केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत प्रवासी विमान वाहतूक सेवेस सुरवात करण्यात आली होती.याचे उद्घाटन तत्कालीन केंद्रीय विमानवाहतूक मंत्री जोतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते इंदूर येथून करण्यात आले होते. तर गोंदिया ते हैदराबाद या विमान सेवेला गोंदिया विमानतळावरून खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली होती.