23.5 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत एड.लखनसिंह कटरे व श्रीपाद अपराजित विजयी

विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत एड.लखनसिंह कटरे व श्रीपाद अपराजित विजयी

0
95

नागपूर,दि.१६विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुका पार पडल्या असून अध्यक्ष व संचालक पदाच्या मतमोजणीचे निकाल जाहीर झाले आहे. त्यानुसार विदर्भ साहित्य संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून गिरीश गांधी निर्वाचित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. गिरीश गांधी यांना एकूण 2261 मते पडली.२२ कार्यकारीणी सदस्यामध्ये २१ सदस्यासंह गिरीश गांधी यांच्या पॅनलने विजय मिळविला आहे.या निवडणुकीतील उर्वरित पॅनलपैकी प्रदिप दाते यांच्या पॅनलचे एकमेव कार्यकारीणी सदस्य श्रीपाद अपराजीत हे २४८० मते घेऊन विजयी झाले.गोंदिया जिल्ह्यातील साहित्यिक एड.लखनसिंह कटरे हे सुध्दा गांधी यांच्या पॅनलमधून २३८४ मते घेऊन विजयी झाले.

विदर्भ साहित्य संघ : कार्यकारिणी सदस्य सर्वाधिक मते मिळविणारे २२ उमेदवार
1) 2758 फडनवीस शुभदा अनिल
2) 2679 मनोहर विष्णु दिगंबर
3) 2549 कुळकर्णी बळवंत जनार्दन
4) 2512 घोंगे पराग श्रीधर
5) 2499 गंपावार अजेय प्रभाकर
6) 2495 सबाने अरुणा
7) 2480 अपराजित श्रीपाद विनायक
8) 2462 रोकडे डॉ. शोभा इंद्रभान
9) 2429 बारस्कर संदीप
10) 2384 कटरे लखनसिंह मोहनलाल
11) 2377 मोहरीर स्वाती
12) 2370 तिडके आसावरी दुद्धरामजी
13) 2353 कुळकर्णी डॉ. जयश्री विश्राम
14) 2280 लाखे चंद्रकांत शंकरराव
15) 2278 इंदाणे अनिल मधुकर
16) 2274 साकुळकर माधुरी कृष्णा
17) 2255 पुनसे डॉ. देवेंद्र चंद्रभानजी
18) 2138 कुळकर्णी अमर
19) 2127 कर्णेवार विजय
20) 2124 धोंड श्याम केशव
21) 2090 शेख इरफान इकबाल
22) 2070 कवठेकर विवेक राम

blank