26.1 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ चंद्रपूर मनपा स्थायी समिती सभापतिपदी सौ.मनस्वी संदीप गिऱ्हे यांची निवड

चंद्रपूर मनपा स्थायी समिती सभापतिपदी सौ.मनस्वी संदीप गिऱ्हे यांची निवड

0
31
चंद्रपूर,दि.१६- महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी सौ.मनस्वी संदीप गिऱ्हे यांची निवड करण्यात आली. सोमवार, १६ मार्च रोजी मनपा राणी हिराई सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत निवडणूक प्रक्रिया पार पडली.
सभेत झालेल्या मतदानात सौ.मनस्वी संदीप गिऱ्हे आणि श्री.वसंत राजेश्वर देशमुख यांना प्रत्येकी ८-८ मते मिळाल्याने निवडणूक ईश्वर चिट्ठीद्वारे घेण्यात आली. या प्रक्रियेत सौ.मनस्वी संदीप गिऱ्हे यांच्या नावाची चिट्ठी निघाल्याने त्यांची स्थायी समिती सभापती म्हणून निवड जाहीर करण्यात आली.जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी अधिकृतपणे निकाल जाहीर केला.
blank