गोंदिया, दि. 17 : बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, गोंदिया येथे सुरु असलेल्या नवजात शिशु केंद्र ज्यामध्ये 36 बेड संख्या असून बालरोगतज्ञ व इतर तज्ञ डॉक्टर स्टाफच्या मदतीने आधुनिक उपकरणाद्वारे गंभीर आजारी नवजात शिशुंचे उपचार होत असतात. सदर नवजात शिशु केंद्राचे नुतनीकरण व अद्ययावतीकरण करण्याच्या दृष्टीने काम सुरु असल्यामुळे तेथील काही बेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया येथील इमारतीमध्ये व इतर बेड बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, गोंदिया येथे असे एकूण 36 बेड सदर नुतनीकरण कामाच्या दरम्यान कार्यरत राहतील व नवजात शिशुंचे उपचार सुरु राहतील. असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी कळविले आहे.





