आधी ओबीसी नंतर राजकारण हाच ध्येय हवा

0
12

अर्जुनी मोरगाव,दि.26-येथील बहुउद्देशीय हायस्कुलच्या प्रांगणात आज बुधवारला झालेल्य ओबीसी संघर्ष कृती समितीच्या सहविचार सभेत येत्या 26 नोव्हेंबरला सविंधान दिनी तालुकास्तरीय ओबीसी मेळावा आयोजित करण्यासोबतच 8 डिसेंबरचा मोर्चा यशस्वी करण्याचा संकल्प उपस्थितांनी घेतला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी डाॅ.दिलीप काकडे होते.या बैठकीला मार्गदर्शन करतांना मान्यवरांनी आधी आपण ओबीसी आहोत नंतर कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या संघटनेचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आहोत हे लक्षात ठेवून आपल्या समाज संघटनेला आधी प्राधान्य दिल्याशिवाय कुठलाही इतर संघटनांचा विचार केलाच जाऊ शकत नसल्याचा सुर या सहविचार बैठकित व्यक्त केला.आजपर्यंत आपण सर्वांना राजकीय पक्षाच्या प्रमुखांना आपआपसातच भांडत ठेवून आपल्या न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याचे काम केल्यानेच आम्ही ओबीसी विकासापासून वंचित राहिलो आहे,आत्ता मात्र संघर्षाची वेळ आली असून कुणी कितीही आपणास तोडण्याचा प्रयत्न केला तरी आपण ओबीसीचा महामोर्चा यशस्वी केल्याशिवाय स्वस्त बसणार नसल्याचे विचार व्यक्त करीत येत्या 26 नोव्हेंबरचा तालुकास्तरीय ओबीसी मेळावा न भुतो न भविष्यतो असा करण्याचा विचार बोलून दाखविला.

प्रमुख वक्ते म्हणून ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष बबलू कटरे,खेमेंद्र कटरे, तालुका खरेदी विक्रीचे अध्यक्ष नामदेव पाटील कापगते,प्रमोद लांजेवार,डाॅ.गजानन डोंगरवार,प्राचार्य यशवंत परशुरामकर,प्रा.सुनिता हुमे,नारायण बहेकार,भोजराम रहेले,अनिरुध्द ढोरे,योगेश गहाणे,भालचंद्र पटले,सचिन फटिंग ,तालुकाअध्यक्ष गिरीश बागडे, नविन नशिने,बालू बडवाईक , सौ .मंजुषा तरोणे,राधेश्याम भेंडारकर, सतिश कोसरकर आदी उपस्थित होते.संचालन ओमप्रकाशसिंह पवार यांनी केले.आभार सुनिता हुमे यांनी मानले.