28.4 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home Top News उष्णतेच्या लाटेमुळे गोंदिया जिल्ह्यात शाळांच्या वेळेत बदल

उष्णतेच्या लाटेमुळे गोंदिया जिल्ह्यात शाळांच्या वेळेत बदल

0
191

गोंदिया, दि. 27 : गोंदिया जिल्ह्यात सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून उष्णतेच्या लाटेचा (हीट वेव्ह) परिणाम नागरिकांच्या6 आरोग्यावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असल्याने त्यांना आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, डॉ. मंगेश गोंदावले यांनी आदेश जारी केले आहेत.
या आदेशानुसार, गोंदिया जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांची वेळ सकाळी 07.00 ते सकाळी 10.00 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच, खाजगी शिकवणी वर्ग (कोचिंग क्लासेस), प्रशिक्षण वर्ग, उन्हाळी शिबिरे (समर कॅम्प) व शिक्षणाशी संबंधित सर्व उपक्रम सकाळी 07.00 ते 10.00 या वेळेत किंवा सायंकाळी 05.00 वाजल्यानंतर घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
नागरिकांनी उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.