28.4 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home शैक्षणिक जिद्द आणि चिकाटीमुळे यश शक्य– उपसभापती संदीप कापगते

जिद्द आणि चिकाटीमुळे यश शक्य– उपसभापती संदीप कापगते

0
50

अर्जुनी/मोर. जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत अर्जुनी/मोर. तालुक्यातील २१ दिव्यांग विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विविध स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत विद्यार्थ्यांनी आपली क्षमता सिद्ध केली.या यशाबद्दल बोलताना पंचायत समितीचे उपसभापती संदीप कापगते यांनी सांगितले की, “दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमामुळेच हे नेत्रदीपक यश शक्य झाले आहे. योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास हे विद्यार्थी भविष्यात आणखी मोठे यश मिळवू शकतात.”
स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी क्रीडा, सांस्कृतिक आणि कला क्षेत्रात आपली चमक दाखवली. शिक्षक, पालक आणि मार्गदर्शक यांच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग सापडला असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सत्कार करताना पंचायत समिती अर्जुनी/ मोर.चे गटशिक्षणाधिकारी जनार्धन राउत शिक्षण विस्तार अधिकारी नाजुक लंजे ,पत्रकार सुरेंद्रकुमार ठवरे ,पालक ऍड. मुनेश्वर शहारे ,अर्जुनी /मोरचे,पवनी केंद्राचे केन्द्रप्रमुख प्रभाकर मेश्राम, केंद्रप्रमुख सु.मो. भैसारे व मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी उपस्थित होते.
स्थानिक स्तरावर या यशाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले असून, विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अर्जुनी/मोर तालुक्याच्या या यशामुळे जिल्ह्यात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषणात तालुका समावेशित शिक्षण समन्वयक योगेश कापगते यांनी केले .सूत्रसंचालन विषय शिक्षक योगराज पुस्तोळे यांनी केले तर आभार विशेष शिक्षक रुमन मानकर यानी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष शिक्षक गौरीशंकर ढबाले, चंद्रशेखर डोंगरे, सुभाष नेवारे, भूमिता सयाम ,चेतना मेश्राम,शशांक खलोकर आदींनी सहकार्य केले.