.तर युवा स्वाभिमान घालणार अधिकाºयांना घेराव 

0
9
रजेगाव-काटी सिंचन प्रकल्पातील भूमिअधिग्रहण प्रकरण
गोंदिया दि. 7 :: रजेगाव-काटी उपसा सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी रावणवाडी येथील जवळपास २० शेतकºयांची शेतजमीन मोबदला न देताच सिंचन प्रकल्पासाठी अधिग्रहीत करण्यात आली. यात तात्काळ दुरूस्ती करून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी तथा फेरफार रद्द करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन शेतकºयांसह युवा स्वाभिमानने १२ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकाºयांना दिले होते. मध्यम प्रकल्प विभागाने महसूल विभागाला फेरफार रद्द करण्याच्या सुचना देवूनसुद्धा फेरफार रद्द करण्यात आले नाही. फेरफार त्वरीत रद्द न केल्यास अधिकाºयांना घेराव करू असा इशारा युवा स्वाभिमानने दिला आहे.
विशेष म्हणजे याप्रकरणी संबंधीत शेतकºयांनी यापुर्वी अनेकदा संबंधीत विभागाकडे न्यायासाठी धाव घेतली. प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांच्या नेतृत्वात निवेदन देवून तत्काळ दुरूस्ती करण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली. दरम्यान लवकरच दुरूस्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मध्यम प्रकल्प विभागाने देखील एसडीओ आणि जिल्हाधिकारी कार्यालयास लेखी पत्राद्वारे फेरफार रद्द करण्याच्या सुचना संबंधीत मंडळ अधिकारी व तलाठ्यांना देण्यात यावे, अशी मागणी केली. निर्देश असतानादेखील अंमलबजावणी झाली नाही. यामुळे शेतकरी संतापले आहेत. न्याय मिळाल्याशिवाय काम होवू देणार नाही. अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. थेट खरेदीची कार्यवाही होवू न शकल्यामुळे संबंधीत कालव्याचे काम पुर्ण करता आले नाही. परिणामी त्यापुढील संपूर्ण क्षेत्र सिंचनापासून वंचित राहणार आहे. यासंदर्भात युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी मध्यम प्रकल्प कार्यालयास भेट देवून कार्यवाहीबाबद आढावा घेतला. जमिनीचे फेरफार त्वरीत रद्द न झाल्यास युवा स्वाभिमान शेतकºयांना घेवून अधिकाºयांना घेराव करेल, असा इशारा प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे. प्रशासनाच्या कार्यवाहीकडे बाधीत शेतकºयांचे लक्ष लागले आहे.