33.2 C
Gondiā
Wednesday, June 24, 2026
Home विदर्भ जाहिरात प्रसिद्ध करत असताना करण्यात आलेल्या उपवर्गीकरणाचा आधार काय? : राजकुमार बडोले

जाहिरात प्रसिद्ध करत असताना करण्यात आलेल्या उपवर्गीकरणाचा आधार काय? : राजकुमार बडोले

0
8
Screenshot
जुनी जाहिरात रद्द करून नवीन प्रकाशित करण्याची आणि प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा : राजकुमार बडोले
मुंबई, दि. २४ जून २०२६ : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना राज्याचे माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार बडोले यांनी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने दैनिक लोकमतच्या नागपूर आवृत्तीत प्रसिद्ध केलेल्या शासकीय वसतीगृह प्रवेश जाहिरातीवर गंभीर सवाल उपस्थित केला.
जाहिरातीमध्ये उपवर्गीकरण?
सन २०२६-२७ शैक्षणिक सत्रासाठी शासकीय वसतीगृह प्रवेश संदर्भातील या जाहिरातीमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाचे उपवर्गीकरण करून विविध गटांसाठी स्वतंत्रपणे जागांचे वाटप दर्शवण्यात आले आहे. राज्यात अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण अद्याप लागू करण्यात आलेले नाही. यासाठी कोणताही शासन निर्णय, अधिसूचना किंवा वैधानिक आदेश अस्तित्वात नाही. असे असताना उपवर्गीकरण करून जाहिरात प्रसिद्ध केल्याने अनुसूचित जातीतील नागरिकांमध्ये असमंजसपणा आणि असंतोष निर्माण झाला आहे, असे बडोले यांनी सभागृहात निदर्शनास आणले.
प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा : राजकुमार बडोले
सदर जाहिरात कोणत्या आधारावर प्रसिद्ध करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करत बडोले यांनी ही जाहिरात तात्काळ रद्द करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याची मागणी केली. तसेच या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्याचीही मागणी केली.