वर्धा, भंडारा व गोंदिया जिल्हयात 21 नोव्हेंबरपासून जात पडताळणी कार्यालय सुरु

0
9

नागपूर दि. 17 :  विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र.1 नागपूर विभाग, नागपूर नवीन प्रशासकीय इमारत क्र.2, 5 वा माळा, सिव्हील लाईन,
नागपूर या समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत वर्धा, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शैक्षणिक, सेवा व निवडणूक विषयक जात प्रमाणपत्र पडताळणीचे
कामकाज या कार्यालयातून नियमीतपणे सुरु होते. 21 नोव्हेंबर 2016 पासून जिल्हास्तरावर कार्यालय सुरु करण्यात येत असल्यामुळे वर्धा, भंडारा व
गोंदिया या जिल्ह्यातील शैक्षणिक व सेवाविषयक अर्ज 18 नोव्हेंबर 2016 पासून या कार्यालयात स्विकारण्यात येणार नाही.
वर्धा, भंडारा व गोंदिया येथील सामाजिक न्याय भवन येथे नव्याने सुरु होणाऱ्या कार्यालयात 21 नोव्हेंबर 2016 पासून सादर करावे. तसेच यापूर्वी सादर केलेल्या जात पडताळणी अर्जात काही आक्षेप असल्यास त्यांनी अर्जदाराचे जात प्रमाणपत्र ज्या जिल्ह्याचे आहे, त्या जिल्ह्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वर्धा, भंडारा व गोंदिया येथे नव्याने सुरु झालेल्या कार्यालयास आक्षेपाची पूर्तता करण्यास्तव अथवा पुढील कार्यवाही संदर्भात संपर्क साधावा.मात्र निवडणूक विषयक अर्जदारांचे अर्ज या कार्यालयात 21 नोव्हेंबर 2016पर्यंत स्विकारण्यात येतील. होणाऱ्या बदलाची अर्जदारांनी नोंद घ्यावी,असे समितीचे उपायुक्त तथा सदस्य सुरेंद्र  पवार यांनी जाहीर आवाहन केले आहे.