राष्ट्रीय महामार्गावर २५ लाखांची रोकड जप्त

0
7
दोन दिवसांत ४५ लाख रुपये जप्त : पैसे निवडणुकीचे की, चलनबदलीचे?
गोंदिया/ देवरी : सध्या विधानपरिषदेची निवडणूक असल्याने महसूल विभागाने सर्वत्र नाकाबंदी केली आहे. गोंदिया-बालाघाट मार्गावरील रजेगाव नाक्याजवळ १५नोव्हेंबर रोजी सायंकाळी इनोव्हा कारमधून तब्बल २० लाख रूपयाची रोकड जप्त करण्यात आली.  बुधवारी देवरीच्या पथकाने राष्ट्रीय महामार्गकÑमांक सहावरील शिरपूर नाक्याजवळ फार्च्यूनरवाहनाच्या तपासणी दरम्यान २५ लाख रुपयांच्या चलनी नोटा  जप्त करण्यात आल्या. दोन्ही घटनांमधील नोटा निवडणुकीकरिता जात होत्या, की जुन्या नोटा खपविण्याकरिता नेल्या जात होत्या, याचा तपास सुरू आहे.
भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतांना निवडणूक विभाग भरारीपथकाच्या माध्यमातून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाºया पैशाच्या घोडाबाजारावर लक्ष ठेवून आहे. यातच आता काळापैसा व भ्रष्टाचारावर आळा घालण्याकरीता यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रूपयाच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांना निवडणुक लढवाव्यात ही चिंता लागली आहे. कारण विधान परिषदेच्या निवडणुका हा प्रामुख्याने पैशाच्या बळावर जिंकल्या जातात. आता चलनातून मोठ्या नोटाच रद्द झाल्याने उमेदवारांसह मतदारांची रोकडातील नोटांना घेवून चांगलीच कोंडी झाली आहे. निवडणुकीच्या पाश्वभूमीवर घोडाबाजार किंवा गैरव्यवहार होऊ नये, यासाठी निवडणूक विभागानेही कंबर कसली आहे. याच पाश्वभूमीवर १५ नोव्हेंबर रोजी नायब तहसीलदार सतीस मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया-बालाघाट मार्गावर सापळा रचला. सायंकाळच्या सुमारास बालाघाटकडून गोंदियाकडे येणाºया सीजी ०४/एच ६४२९ क्रमांकाच्या इनोव्ह वाहनाची तपासणी केली असता वाहनात चलनबाद एक हजाराच्या नोटांचे २० बंडल असे एकूण २० लाख रूपयाची रोकड सापडली. याप्रकरणी वाहनासह पियुषकुमार चौबे, यशवंतकुमार जंघेल व गाडीचालक संतोष निसार सर्व रा. राजनांदगाव यांना ताब्यात घेतले असून जप्त केलेली रोकड कोषागारात जमा करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी गोंदिया यांनी विधानपरिषद निवडणूक लक्षात घेता सर्व्हीलन्स पथक तयार केले आहे. देवरी येथील पथकात नायब तहसिलदार पटले आणि तलाठी गजभिये यांनी राष्ट्रीय महामार्ग कÑमांक सहावर पहारा देवून वाहनांची तपासणी केली. आज बुधवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास एम एच ३१, डीसी ७१७५ कÑमांकाच्या फार्च्यूनर वाहनाची त्यांनी तपासणी केली.दरम्यान त्या वाहनात पाचशे रुपयांच्या पाच हजार नोटा म्हणजे २५ लाख रुपये आढळून आले. पथकाने त्या नोटा जप्त करून वाहन देवरी पोलिसांच्या स्वाधीन केले. हे वाहन तजेंदरसिंग सलोकसिंग सिद्धु (वय ३१, रा. लष्करी बाग नागपूर) यांच्या मालकीचे असून ते वाहनात होते. जप्त करण्यात आलेले पैसे नेमके कुणाचे आहेत, ते कोणत्या कामाकरिता नेले जात होते, याचा तपास देवरी महसूल विभाग आणि पोलिस करत आहेत.