सालेकसा– तालुक्यातीलआरोग्य संस्थेत दर महिन्याला जनआरोग्य समितीची सभा आयोजित केली जाते. जन आरोग्य समिती (JAS) ही एक अत्यंत महत्त्वाची स्थानिक समुदाय आरोग्य समिती आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य सेवांमध्ये स्थानिक लोकांचा सहभाग वाढवणे, पारदर्शकता आणणे आणि आरोग्य सेवांचा दर्जा सुधारणे हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट असते.
सालेकसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध येथे दि.21 रोजी जनआरोग्य समितीची सभा आयोजित करण्यात आली होती.सभेत उपस्थित जिल्हा परिषद सदस्य विमलताई कटरे व छायाताई नागपुरे व मान्यवरांचे हस्ते क्षयरुग्णांना फुड बास्केट वितरीत करण्यात आल्याची माहीती तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ.सुषमा देशमुख यांनी दिली आहे. यावेळी कार्यक्षेत्रातील आठ क्षयरोगी रुग्णांना फुड बास्केट वितरीत करण्यात आले.
क्षयरोगाच्या रुग्णांसाठी पौष्टिक ‘फूड बास्केट’ अतिशय महत्त्वाची असते. टीबीच्या औषधांमुळे रुग्णांची भूक मंदावते आणि शरीरातील ऊर्जा कमी होते.सकस आहारामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, औषधांचे दुष्परिणाम कमी होतात, वजन स्थिर राहते आणि रुग्ण लवकर बरा होत असल्याची माहीती वैद्यकीय अधिकारी डॉ.सुषमा देशमुख यांनी दिली आहे.
या वेळी जनआरोग्य समिती सभेदरम्यान जिल्हा परिषद सदस्य विमलताई कटरे व छायाताई नागपुरे,पंचायत समिती सदस्य प्रतिलाताई गणवीर,सभापती यादनलालजी बनोठे,सरपंच कुंजलाल नवगोडे,अरुण मच्छिरके, पुरुषोत्त बनोठे, सामाजिक कार्यकर्ते गणवीर, नागपुरे, वच्छलाताई बावनथडे व स्मिता कटरे यांचे उपस्थित मान्यवरांचे हस्ते क्षयरुग्णांना फुड बास्केट वितरीत करण्यात आले.यावेळी सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील आत्राम, वैदकीय अधिकारी डॉ.सुषमा देशमुख व डॉ.रोहिणी पवार यांचे सह तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध येथील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.





