24 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ बाळासाहेबांना दिली आदरांजली

बाळासाहेबांना दिली आदरांजली

0
23

गोंदिया दि.१९:हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त येथील शिवसेना जिल्हा कार्यालयात गुरूवारी (दि.१७) आदरांदली अर्पित करण्यात आली. यानिमित्त माजी आमदार रमेश कुथे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिप प्रज्वलीत करून छायाचित्राला माल्यार्पण करण्यात आले. दरम्यान शिवसेना, विद्यार्थी सेना व युवा सेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनीही श्रद्धांजली अर्पित केली. याप्रसंगी जिल्हाप्रमुख राजकुमार कुथे, मुकेश शिवहरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत ठवकर, उप जिल्हाप्रमुख सुनिल लांजेवार, तेजराम मोरघडे, समीर आरेकर, दीपक बोबडे, हिमांशू कुथे, गयाप्रसाद मिश्रा, हंसू वासनीक, विनोद तामसेटवार, विकास नागरीकर, राहूल नागपूरे, अनूप माणिकपुरी, जयेश चव्हाण, प्रशांत गणवीर, अभय मानकर, भुपेंद्र पाचे व अन्य उपस्थित होते.

blank