23.5 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ पाळा प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा द्या-आदिवासी समाजाची मागणी

पाळा प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा द्या-आदिवासी समाजाची मागणी

0
28

बुलढाणा,दि.21-जिल्ह्यातील पाळा येथील आदिवासी निवासी आश्रम शाळेतील 10 वर्षीय शालेय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार झाल्याप्रकरणात सर्व 17 आरोपी अटक करण्यात आले. त्या आरोपिना कड़क शिक्षा झाली पाहिजे तसेच अट्रासिटी कायदाची अंमलबजावणी क़डक करण्यात यावे  या मुख्य मागणीला घेऊन आदिवासी समाजाच्यावतीने बुलड़ाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी विद्यार्थिनी विद्यार्थी व् समाजबांधव महिला पुरुषाचा भव्य मोर्चा काढण्यात आला.बुलढाणा शहराच्या मुख्य मार्गावरून हां मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड घोषणा देत धडकला .10 मुलींच्या शिष्ट मंडळाने अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे याना निवेदन दिले.

blank