विधान परिषद निवडणुकीच्या 6 जागांचे निकाल जाहीर

0
18

मुंबई,२२ – विधान परिषदेच्या पुणे, सांगली-सातारा, जळगाव, नांदेड, यवतमाळ आणि गोंदिया या सहा ठिकाणी झालेल्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. विधान परिषदेच्या सहा पैकी भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला एक-एक जागेवर विजय मिळाला आहे.
राज्यातील विधान परिषद निवडणुकीचा निकाल पुढील प्रमाणे-

१. पुणे विधान परिषद- अनिल भोसले विजय विजयी
अनिल भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस) – ४४० मते
अशोक येनपुरे (भाजप) -१४० मते
संजय जगताप (काँग्रेस) – ७२ मते

२.यवतमाळ विधान परिषद – शिवसेनेचे तानाजी सावंत विजयी,
तानाजी सावंत यांना ३४८ मते तर काँग्रेसचे शंकर बढे यांना ७८ मते मिळाली.

३. नांदेड विधान परिषद -अमर राजूरकर विजयी
अमर राजूरकर (काँग्रेस) – २५१ मते
श्याम सुंदर शिंदे (अपक्ष) –  २०८ मते

४. सांगली-सातारा विधान परिषद – मोहनराव कदम विजयी
मोहनराव कदम (काँग्रेस) – ३०९ मते
शेखर गोरे (राष्ट्रवादी काँग्रेस)- २४६ मते
शेखर माने (अपक्ष) – २ मते

५. जळगाव विधान परिषद- चंदुलाल पटेल विजयी.

६. भंडारा-गोंदिया विधान परिषद-  परिणय फुके विजयी.
परिणय फुके (भाजप) – २२० मते
राजेंद्र जैन (राष्ट्रवादी काँग्रेस) – १३७ मते
प्रफुल्ल अग्रवाल (काँग्रेस) – ११२ मते