26.9 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ आज रावणवाडी येथे रक्तदान शिबीर

आज रावणवाडी येथे रक्तदान शिबीर

0
32

रावणवाडी : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित युवा स्वाभिमान शाखा रावणवाडीच्या वतीने सोमवार २८ नोव्हेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रावणवाडी येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजतापासून या शिबीराला सुरुवात होणार आहे. युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील तरुणांनी या शिबीरात मोठ्या संख्येने सहभागी होवून रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.