भाजप कार्यालयात संविधान दिन

0
15

गोंदिया : भारतीय जनता पक्षाकडून संपूर्ण राज्यात बुथ स्तरावर सुराज्यपर्व आयोजित करण्यात आले आहे. या महाअभियानाचा माध्यमातून सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवून सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयाबद्दल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाराष्ट्रबद्दल असलेल्या धोरणाबद्दल, सरकारच्या मागील दोन वर्षातील कामगिरीबद्दल, महाराष्ट्राला सुराज्य बनविण्यासाठी सरकारकडून लोकसहभागाला प्रोत्साहन आदी गोष्टीबद्दल प्रचार-प्रसार करायचे आहे. याकरिता ‘जनसंवादङ्क व सुराज्य संमेलन या उपक्रमाच्या माध्यमातून घरोघरी जावून कार्यकत्र्यांनी सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या योजना व धोरणाबाबत माहिती द्यावी व त्यांची मते जाणून घ्यावी, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केले.
ते २६ नोव्हेंबर रोजी भाजप जिल्हा कार्यालयात आयोजित बैठकीत कार्यकत्र्यांना संबोधीत करताना बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा महामंत्री संघटन विरेंद्र अंजनकर, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, अशोक इंगळे, जिल्हा संपर्क प्रमुख संतोष चव्हाण, संजय कुलकर्णी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, शहर अध्यक्ष सुनील केलनका, जयंत शुक्ला, मनोहर आसवानी, न.प. बांधकाम सभापती बंटी पंचबुद्धे, शिव शर्मा, संजय मुरकुटे, शंभूशरण ठाकूर, अजय लौंगानी, अभय अग्रवाल, मैथेली पुरोहीत आदी उपस्थित होते. सर्वप्रथम संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने बाबा बिसेन, धर्मेंद्र डोहरे, कुशल अग्रवाल, रमेश दलदले, जगदीश मिश्रा, कुवर बिसेन, ऋषीकांत शाहू, पंकज सोनवाने, सुरेश चंदनकर, सतीश मेश्राम, गोल्डी गावंडे, ऐजाज खान, बंटी डोंगरे, संतोष पटले, छोटु रामटेक्कर, निरज ठाकूर, मयुर मेश्राम, मुकेश चन्ने, मिqलद बागडे, वसंत गणवीर, अतुल फेंडारकर, दुर्गेश भिवगडे, राजू पटले, गोपलानी, सुनील डबरे आदी उपस्थित होते