23.5 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ संत जगनाडे महाराज जयंती ११ डिसेंबरला

संत जगनाडे महाराज जयंती ११ डिसेंबरला

0
27

गोंदिया : श्री संताजी विकास मंडळ गोंदियाच्या वतीने संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त उप वरवधू परिचय मेळावा, समाज मेळावाआणि सत्कार समारंभ तसेच समाजभवनाच्या पहिल्या माळ्याच्या बांधकामाचे भूमिपूजन, आरोग्य व रक्तदान शिबीर आदी भरगच्च कार्यकÑमांचे आयोजन ११ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. कार्यकÑम श्री संत जगनाडे महाराज सभागृह सुर्याटोला येथे पार पडणार आहे.
कार्यकÑमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अरविंद हिंगे राहणार असून उद्घाटन शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या हस्ते पार पडणार आहे. कार्यकÑमाचे स्वागताध्यक्ष सुनिल लांजेवार राहतील. यावेळी आनंदराव कृपाण, पÑा. बी. एम. करमकर, उमेंदÑ भेलावे, पÑा. नामदेवराव हटवार, माधुरीताई नासरे,आशा पाटील, सुनिता भेलावे यांची पÑामुख्याने उपस्थिती राहणार आहे. सकाळी ११ वाजता कार्यकÑमाचे उद्घाटन पार पडणार आहे. कार्यकÑमाला समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संताजी विकास महामंडळाच्या पदाधिकाºयांनी केले आहे.