23.5 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ शहर भाजपा तर्फे बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सत्कार

शहर भाजपा तर्फे बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सत्कार

0
21

गोंदिया : शहर भारतीय जनता पार्टी तर्फे आज २९ नोव्हेंबर रोजी भाजपा शहर अध्यक्ष सुनील केलनका यांच्या अध्यक्षतेखाली नोटबंदी नंतर सर्व बँकानी दिलेल्या अमूल्य योगदानाकरीता शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन शाखा व्यवस्थापक व कर्मचाèयांचे सत्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद संपविन्याकरिता ५०० व १००० च्या नोटबंदीच्या निर्णयानंतर देशातील सर्वच बँकेच्या अधिकारी व कर्मचाèयांनी रात्र-दिवस कार्य करून राष्ट्र कल्याण कारीता अमूल्य योगदान दिले. या करीता भाजपा तर्फे स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले. यात प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनेरा बँक, सेंटड्ढल बँक, इंडियन ओवरसीज बँक, पंजाब नेशनल बँक, सिंडिकेट बँक, एक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आईडीबीआई बँक, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, इलाहाबाद बँक, इंडियन बँक व जनता सहकारी बँकेचा सहभाग होता. या वेळी प्रामुख्याने संजय कुलकर्णी, मनोहर आसवानी, राजा कदम, अशोक जयसिंघानी, प्रितेश रामटेक्कर, गोल्डी गावंडे, यशराज बहेकार, राकेश लांजेवार, मिलिंद बागडे, राजू पटले, सम्राट डोंगरे, अरुण कालसर्पे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

blank