24.2 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ युवा स्वाभिमान लढणार नगर परिषद निवडणुक उमेदवारीकरिता अर्ज आमंत्रित

युवा स्वाभिमान लढणार नगर परिषद निवडणुक उमेदवारीकरिता अर्ज आमंत्रित

0
25

गोंदिया : येथील नगर परिषदेच्या निवडणूक रणांगणात यंदा प्रथमच युवा स्वाभिमान एन्ट्री मारणार आहे. सर्वच जागांसाठी स्वबळावर ही निवडणुक आमदार रवि राणा यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात येणार असल्याची माहिती युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली आहे.
येत्या ८ जानेवारी २०१७ रोजी होणाºया गोंदिया नगर परिषदेच्या अध्यक्ष व २१ प्रभागातील ४२ जागांच्या निवडणुकीसाठी युवा स्वाभिमानकडून निवडणूक लढण्यास इच्छूक उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे.युवा स्वाभिमान जिल्हा जनसंपर्ककार्यालयात अर्ज उपलब्ध करण्यात आले असून इच्छूकांनी कार्यालयातून प्राप्त करून घ्यावे. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढविण्यात येत असून इच्छुकांनी शक्य तितक्या लवकर आपली उमेदवारी पक्की करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष टोकेश हरिणखेडे, जिल्हा महासचिव जीवन शरणागत, संयोजक सुनिल वाघमारे यांनी केले आहे.