निराधार कुटुंबाला मायेचा आधार

0
19

तिरोडा,दि.04- तालुक्याच्या चिरेखनी येथील पुरुषोत्तम कटरे यांचा २२ नोव्हेंबरला मृत्यू झाला. जवाबदारी पुरूषोत्तम कटरे यांच्या पत्नीवर आली. सोबत सासू, एक मुुलगी आचल कटरे १२ व्या वर्गात तिरोडा येथे शिकत असून मुलगा चंद्रकृपाल कटरे पाचव्या वर्गात गावातच जि.प.शाळेत शिकत आहे. २६ नोव्हेंबरला पुष्पलता कटरे यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी मुलगी आचलवर आली. आजी अर्धांगवायुने पिडीत आहे.या निराधार मुला-मुली व आजीच्या मदतीला सामाजिक सेवा संस्था, सामाजिक कार्यकर्ते पुढे येऊन मदतीचा हात देतील का? पोस्टर व बॅनर पुरतेच राहतील या निराधारांना शासकीय अनुदानाचा आधार मिळवून देण्याची हमी दिली. सोबत रुबीना कुरैशी, शिला पारधी, सरीता चव्हाण, राणी बालकोेठे, अर्चना नखाते यांनीही आधार दिला

घरी खायला अन्न नाही, कुटूंबाचा आधार नाही. आचल हुशार असून दहावीत ८८ टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम आली होती. ती आता वर्ग १२ वीत विज्ञानमध्ये असून तिच्या परीक्षेची शुल्क सामाजिक कार्यकर्ती शिक्षीका शिला पारधी यांनी दिली होती. चंद्रपाल पाचवीत व आजी सातन चैतराम कटरे (७१) असून अर्धांगवायुने ग्रस्त आहे. आचल आजीची, भावाची देखभाल घरचा संपूर्ण काम करून अभ्यास करून शाळेत ती जाते. मात्र तीने आपबिती संपूर्ण माहिती शिक्षीका शिला पारधीला दिली. पारधी यांनी ही बाब सामाजिक कार्यकर्ती व लायनेन्स क्लबच्या अध्यक्षा अ‍ॅड. माधुरी रहांगडाले यांना सांगितले. लगेच अ‍ॅड. माधुरी रहांगडाले यांनी आचल कटरेचे घर चिरेखनी गाठले. परिस्थीती बघितले असता बिकट घरही तुटले. बीपीएल लाभार्थी पण ग्रामपंचायतने साधी आपुलकी ही दाखविली नाही. माधुरी रहांगडाले यांनी आपल्याकडून रोख ५०० रुपये व अंगावरील थंडीचे कपडे दिले.