ओबीसी महामोर्च्याला अॅड.आंबेडकरांचा जाहीर पाठिंबा

0
8

नागपूर,दि.03 : डबघाईस आलेल्या देशातील बँका वाचविण्यासाठी नोटा बदलविण्याचा कार्यक्रम सरकारने राबविला, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे नेते अँड़ प्रकाश आंबेडकर यांनी केला.तसेच येत्या ८ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे नागपुरातील विधानभवनावर राज्यघटनेने दिलेल्या सवैधानिक अधिकारासाठी काढण्यात येणार्या ओबीसी महामोर्चाला आपला पाठिंबा जाहीर केला. यासाठी ते शुक्रवारी (२ डिसेंबर) नागपुरात आले त्या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय चांगला असला तरी यामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे. त्यांचा आर्थिक कणा मोडला असून कोणताही काळा पैसा बाहेर आलेला नाही. दहशत वादावरही याचा परिणाम झाला नाही. मोठमोठी कर्ज दिल्यामुळे व हे कर्ज बुडल्यामुळे बँका डबघाईस आल्या होत्या. बँकांना वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळाले.याकडे लक्ष वेधले असता आंबेडकर म्हणाले, हा भाजपाचा विजय नसून नोटाबदलीचाच विजय आहे. पत्रपरिषदेला भाऊ लोखंडे, या. वा. वडस्कर, नागेश चौधरी उपस्थित होते.