भंडारा जिल्ह्यातून हजारोच्या संख्येतून ओबीसींनी महामोच्र्यात सहभागी व्हावे

0
13

लाखनी,दि.०५-आपल्या संवैधानिक अधिकारांसाठी सर्व ओबीसींनी ‘नवे पर्व ओबीसी सर्व‘ म्हणत एकत्र यावे आणि महामोच्र्यात लाखोंच्या संख्येने सहभागी असे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंंघाचे संयोजक प्राचार्य डॉ.बबनराव तायवाडे यांनी केले. ते राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ओबीसी संघर्ष कृती समिती व सर्व ओबीसी संघटनांच्या वतीने विधानभवनावर आयोजित ८ डिसेबंरच्या ओबीसी महामोच्र्याच्या पाश्र्वभुमीवर जिल्हास्तरीय ओबीसी महामेळ्यावत उदघाटक म्हणून बोलत होते.
मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय पक्ष समन्वयक तथा माजी खासदार डॉ.खुशालजी बोपचे होते.अध्यक्षस्थानी माजी आमदार सेवकभाऊ वाघाये होते प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद भंडाराच्या अध्यक्षा भाग्यश्रीताई गिल्लोरकर,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे युवा समिती प्रमुख मनोज चव्हाण,ओबीसी संघर्ष कृती समितीचे संयोजक व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रसिध्दी प्रमुख खेमेंद्र कटरे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संघटक गुणेश्वर आरीकर, जि.प.सदस्य होमराज पाटील कापगते, नीलकंठ कायते, मनोहर राऊत, ज्ञानेश्वर रहांगडाले, उर्मिलाताई आगाशे, ओबीसी संघर्ष कृती समितीचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अजयराव तुमसरे, डॉ.अमित गायधनी, ओबीसी सेवा संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर, ज्येष्ठ कार्यकर्ते माधवराव भोयर, अधिवक्ता संघाचे लाखनी तालुका अध्यक्ष रविभूषण भुसारी उपस्थित होते.यावेळी बोलतांना डॉ.बोपचे यांनी आपल्यावर सर्वांनीच अन्याय केला असून आत्ता संघटित होण्याची वेळ असल्याचे सांगितले.तसेच ओबीसी समाजाच्या विविध मागण्या कोणत्या आहेत याची माहिती देत ओबीसींनी आता ‘जय ओबीसी‘ चा नारा देत एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी संवैधानिक मार्गानी लढले पाहिजे आणि त्यासाठीच ‘विधानभवनावर ओबीसी महामोर्चा‘ आयोजित केल्याचे प्रतिपादन यावेळी केले.भंडारा जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधवांनी महामोच्र्यात सहभागी व्हावे असे आवाहन सेवकभाऊ वाघाये पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.युवा समितीचे प्रमुख मनोज चव्हाण यांनी युवकावंर कशाप्रकारे सरकारने अन्याय करीत बेरोजगार केले आहे,चांगल्या शिक्षणापासून वंचित केले याची माहिती दिली.मेळाव्याचे प्रास्ताविक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रसिद्धी प्रमुख व ओबीसी संघर्ष कृती समितीचे संयोजक खेमेंद्र कटरे यांनी तर सूत्रसंचालन प्रशांत वाघाये यांनी आणि आभार उमेश सिंगणजुडे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात ओबीसी बांधव, युवक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशश्वितेसाठी उमेश सिंगनजुडे, सजंय वनवे, जयकृष्ण फेंडरकर, अशोक गायधने, गोपाल नाकाडे, सुधीर काळे, मंगलमूर्ती किरणापुरे, विशाल हटवार, प्रशांत वाघाये, नितेश टिचकुले, रेवाराम वाघाये, नाना वाघाये तसेच सर्व कार्यकत्र्यांनी विशेष परिश्रम घेतले.