ओबीसींचा ५२ टक्के आरक्षणासाठी वणवा पेटणार

0
16

आमगाव,दि.०४ : ओबीसी संवैधानिक हक्कापासून वंचित आहे. ५२ टक्के ओबीसींना ५२ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. आरक्षणासाठी ओबीसींचा वणवा आता पेटणारच, असा संकल्प आमगाव तालुक्यात ओबीसी जनचेतना अभियानातर्गंत झालेल्या ओबीसी महामोच्र्याच्या नुक्कड सभांच्यावेळी ओबीसी बांधवांनी घेतला.गोंदिया तालुक्यातून आमगाव तालुक्यात २ डिसेंबरला ओबीसी महामोच्र्यानिमित्त गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीने काढलेल्या जनचेतना अभियानाचे आगमन झाले.ओबीसी जनचेतना अभियान यात्रेला नागरिकांनी प्रतिसाद देत आम्ही आधी ओबीसी नंतर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ही भूमिका मांडत यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले.ठाणा येथे जिल्हा परिषद सदस्य शोभेलाल कटरे यांनी यात्रेचे स्वागत केले.त्यानंतर रिसामा येथे झालेल्या सभेत रिसामावासियांनीही महामोर्चा यशस्वी करण्याचा संकल्प घेतला.चिरचाळबांध येथील सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य येळे होते.यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,महासचिव मनोज मेंढे,संघटक जिवन लंजे,ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष बी.एम करमकर यांनी विचार व्यक्त करीत महामोर्चा यशस्वी करंम्याचे आवाहन केले.यावेळी खेमेंद्र कटरे,डॉ.गुरुदास येडेवार,लिलाधर गिरिपुेजे,हरिष ब्राम्हणकर,विनोद चौधरी,रामकृष्ण गौतम,प्रेमलाल साठवणे,मुक्तानंद पटले,विनायक येडेवार,सावन कटरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कालीमाटी येथील ग्रामपंचायत भवन परिसरात झालेल्या सभेला ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,संघटक जिवन लंजे,माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर यांनी मार्गदर्शन केले.विजय शिवणकर यांनी आपल्या भाषणातून ओबीसी समाजबांधवानी राजकीय मतभेद बाजुला सारुन सामाजिक संघटनेच्या या आंदोलनात सहभागी होण्याची गरज असल्याचे सांगत आपल्या ओबीसी समाजाचे अधिकार काही मुठभर लोक हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.यावेळी गावात विद्याथ्र्यांची रॅली काढून जनजागृती करण्यात आली.तसेच महामोच्र्यासाठी गावातून २ बसेसेच्या माध्यमातून विद्यार्थी,नागरिकांना घेऊन जाण्याची तयारी स्थानिकांनी दाखवली.ही यात्रा ननसरी,कट्टीपार,किकरीपार,पदमपूर,अंजोरा ,पानगाव,वळद मार्गे फुक्कीमेठा येथे पोचली.याठिकाणी झालेल्या सभेत जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमध्ये सर्वात आधी आपल्याला ३४० व्या कलमात अधिकार दिलेले आहेत.परंतु ते अधिकार आपल्याला स्वातंत्र्याच्या ६९ वर्षानंतरही कुठल्याच सरकारने दिले नसल्याचे सांगत आपल्या अधिकारासाठी एससी व एसटी बांधवानी लढा दिला परंतु त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी आमची विरोधी राहिल्याने आम्ही आरक्षण व बाबासाहेबांना समजू शकलो नसल्यानेच आमच्य समाजाचे वाटोळे झाल्याचे विचार मांडले.यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ.खुशाल बोपचे यांनीही विचार व्यक्त tigaon-obc-saba-1केले.संचालन सावन कटरे यांनी केले.
त्यानंतर ही जनचेतना अभियान यात्रा जांभुळटोला मार्गे तिगाव येथे रात्री ८.३० वाजता दाखल झाली.यावेळी तिगाव येथील ५० च्यावर ओबीसी युवकांनी मोटारसायकल रॅली काढून यात्रेचे स्वागत केले.त्यानंतर ग्रामपंचायत भवन परिसरात सभेचे आयोजन करण्यात आले.या सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय पक्ष समन्वयक डॉ.खुशाल बोपचे हे होते.यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,महासचिव मनोज मेंढे,संघटक जिवन लंजे,ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष बी.एम करमकर ओबीसी संघर्ष कृती समितीचे सयोजंक मार्गदर्शक खेमेंद्र कटरे,डॉ.गुरुदास येडेवार,लिलाधर गिरिपुेजे,हरिष ब्राम्हणकर,जिल्हाउपाध्यक्ष प्रा.हुकरे,विनायक येडेवार,सावन कटरे,हसांताई पटले,दिनेश शिवणकर,दिनेश तिरेले,श्री पटले,श्री बिसेन सर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ.बोपचे म्हणाले की या देशाच्या विकासात शेतकरी,शेतमजुरांचा मोठा वाटा आहे.परंतु आजही त्यांना पाहिजे तो सन्मान मिळालेला नाही,त्यांना उत्पादन खर्चानुसार भाव मिळालेला नाही.आज शेतकरी,शेतमजुराची पिळवणुक केली जाते आपल्या मुलांना चांगले शिक्षण आर्थिक परिस्थिती योग्य नसल्याने देऊ शकत नाही.याकरीताच शेतकरी शेतमजुरांना वयाच्या ६० व्या वर्षीपासून पेंशन लागू करण्यात यावे ही मुख्य मागणी आम्ही या महामोच्र्याच्या माध्यमातून सरकारकडे मांडणार असल्याचे सांगत शेतकरी,शेतमजुरांना या ओबीसी महामोच्र्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.