शिवछत्रपती महाराजांच्या स्मारक फ्लेक्सचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

0
10

गोंदिया,दि.२० : मुंबई येथील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमीपूजन येत्या २४ डिसेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाला राज्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
या स्मारकाच्या जलपूजन व भूमीपूजनाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे यासाठी शिवछत्रपतींचा आशीर्वाद आभाळाएवढ्या भव्यतेला समुद्राची साथ या वाक्यासह स्मारकाची सचित्र माहिती असलेल्या फ्लेक्सचे विमोचन २० डिसेंबर रोजी मयूर लॉन कटंगीकला येथे एका कार्यक्रमात करण्यात आले.
शिवछत्रपती शिवाजी महाराजांवरील स्मारक फ्लेक्स विमोचन प्रसंगी पालकमंत्री राजकुमार बडोले, खासदार नाना पटोले, जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.महिला व बाल कल्याण समिती सभापती विमल नागपूरे, जि.प.शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे, सालेकसा पं.स.सभापती हिरालाल फाफनवाडे, आमगाव पं.स.सभापती हेमलता डोये, गोंदिया पं.स.सभापती स्नेहा गौतम, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, राजेश देशमुख, राजकुमार पुराम, कटंगीच्या सरपंच कांता नागरीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते गोंदिया तालुक्यातील कटंगीकला सरपंच कांता नागरीकर, ग्रामसेवक ए.सी.राणे, गोरेगाव तालुक्यातील मुददोली सरपंच सशेंद्र भगत, सचिव आर.एन.बहेकार, सडक/अर्जुनी तालुक्यातील घाडबोरी/तेलीचे सरपंच नाजुकराव झिंगरे, ग्रामसेवक श्रीमती एस.डी.मुंडे, सालेकसा तालुक्यातील बिजेपारच्या सरपंच श्रीमती नितु वालदे, ग्रामसेवक एस.बी.पटले, देवरी तालुक्यातील ढिवरीटोलाच्या सरपंच पुष्पा मडावी, ग्रामसेवक आर.बी.बोरसरे, तिरोडा तालुक्यातील बोदा येथील सरपंच महेंद्रसिंग चव्हाण, ग्रामसेवक ओ.के.रहांगडाले, आमगाव तालुक्यातील मुंडीपारच्या सरपंच माया उईके, ग्रामसेवक बी.एच.पटले आणि अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील सिलेझरीचे सरपंच प्रकाश टेंभूर्णे, ग्रामसेवक जे.एस.नागलवाडे यांना या फ्लेक्सचे वितरण करण्यात आले.
जिल्ह्यातील ग्रामपंचायती, शाळा, आरोग्य केंद्र, तलाठी कार्यालय तसेच पर्यटनस्थळे देखील हे फ्लेक्स लावून जास्तीत जास्त जणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमीपूजन व जलपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन या फ्लेक्सच्या माध्यमातून करण्यात आले आहे.