१३ जानेवारीला गोंदिया फेस्टीवल निमित्त फोटोग्राफी कार्यशाळा

0
6

गोंदिया,दि.८ : अनेक छायाचित्रकारांमध्ये निसर्ग व वन्यजीवांचे छायाचित्र काढण्याची आवड निर्माण व्हावी. तसेच अनेक हौसी छायाचित्रकार जिल्ह्यातून तयार व्हावेत यासाठी गोंदिया फेस्टीवलच्या निमित्ताने फोटोग्राफी कार्यशाळेचे आयोजन १३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले आहे. प्रसिध्द आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रकार नयन खानोलकर हे कार्यशाळेत सहभागी छायाचित्रकारांना मार्गदर्शन करतील.
श्री.खानोलकर हे प्रसिध्द आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रकार असून आंतरराष्ट्रीय निकॉन या प्रसिध्द फोटोग्राफी कॅमेराचे ते ब्रँड ॲम्बेसीडर आहे. सन २०१६ चा बीबीसी वाईल्डलाईफ ऑस्कर पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. श्री.खानोलकर हे उपस्थित छायाचित्रकारांना फोटोग्राफीचे तंत्रशुध्द प्रशिक्षण देतील. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ३०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या हौसी फोटोग्राफर व वन्यजीव छायाचित्र काढण्याची आवड असलेल्या फोटोग्राफर्सनी आपली नाव नोंदणी वन्यजीवप्रेमी सावन बहेकार (९४२०५१५०४१) यांचेकडे करावी. असे आयोजन समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.