3 वाजेपर्यंत गोंदिया 44.65 टक्के व तिरोड्यात 47.68 टक्के मतदान

0
8

खासदार प्रफुल पटेलांचे पोस्टल मतदान
पुर्णा पटेल व प्रज्वल पटेलांची मतदानास दांडी
रामनगर परिसरात तणाव,बीएचजे मतदान केंद्रानजीक अपक्ष उमेदवाराची दगडफेक

गोंदिया,दि.09- गोंदिया व तिरोडा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी आज ८ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरवात झाली.सकाळपासूनच मतदानासाठी मतदारामध्ये अनुत्साह दिसून आला.तर गोंदिया शहरातील रामनगर,सिंधी काॅलनी भागासह छोटा गोंदियातील काही मतदान केंद्रावर तणावाची स्थीती बघावयास मिळाली.बीएचजे मतंदान केंद्रानजीक एका अपक्ष उमेदवारांने दुसर्या अपक्ष उमेदवारावर दगडफेक केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.सरासरी दुपारपर्यंत मतदान हे संथगतीने होत असल्याचे दिसून आले.गोंदिया शहरात दुपारी दीड वाजेपर्यंत 27.79 टक्के मतदान तर तिरोडा येथे 29.80 टक्के मतदान झाले होते.गोंदिया व तिरोडा न.प.सार्वत्रिक निवडणूक दुपारी 3:30 वाजतापर्यंत गोंदिया-44.65%
तिरोडा-47.68% मतदान झाले आहे.मतदान टक्केवारी माहिती उपलब्ध करुन देण्यात प्रशासन मात्र अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
आज मतदानाला सुरवात झाल्यानंतर नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेल्या सर्वच उमेदवारांनी आपल्या मतदानकेंद्रावर आधी मतदान केले.भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक इंगळे यांनी विवेक मंदीर शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या वर्षा पटेल यांनी नमाद महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर,माजी आमदार राजेंद्र जैन यांनी सपत्नीक नगरपरिषदेच्या आवारात असलेल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी मतदानाचा हक्क न बजावता त्यांनी पोस्टल मतदान केल्याची माहिती त्यांच्या कार्यालयीन सुत्रांनी दिली.तर त्यांची सुपुत्री युवती नेतृत्व पुर्णा पटेल,प्रज्वल पटेल हे मात्र मतदानासाठी गोंदियात आले नसल्याने त्यांनी मतदान टाळले.
गोंदिया नगराध्यक्ष पदासाठी १४ उमेदवार तर तिरोडा येथे ८ उमेदवार नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवित आहे. गोंदिया येथून २५७ उमेदवार आणि तिरोडा येथून ७२ उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणूक रिंगणात आहे. गोंदिया येथील २१ प्रभाग आणि तिरोडा येथील ८ प्रभागासाठी निवडणूक होत आहे. गोंदिया येथे १४३ आणि तिरोडा येथे ५८ मतदान केंद्रावर मतदान सुरु आहे.उमेदवारांनी मतदान केंद्राबाहेर आपल्या कुटुंबियासह ठाण मांडले आहे.तर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे प्रत्येक केंद्रावर जाऊन पाहणी करीत मतदाराना नमस्कार करीत असल्याचे चित्र होते.तिरोडा येथे सुरवातीला महिलांनी मतदानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवल्याचे बघावयास मिळाले.विशेष म्हणजे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी गोंदिया व तिरोडा येथील काही मतदान केंद्रांना भेटी सुध्दा दिल्या.