23.8 C
Gondiā
Saturday, July 18, 2026
Home विदर्भ उपअभियंता,मेडीकल काॅलेजचे प्राध्यापकासह बँक व पाटबंधारे विभागाच्या कर्मचार्याना दंड

उपअभियंता,मेडीकल काॅलेजचे प्राध्यापकासह बँक व पाटबंधारे विभागाच्या कर्मचार्याना दंड

0
23

गोंदिया,दि.09 : नागपूर ते गोंदिया दरम्यान हजारोच्या संख्येत मासिक पासधारक दररोज रेल्वेने प्रवास करतात. अशात बुधवार (दि.४) एक्सप्रेस गाडी गोंदियाच्या प्लॅटफॉर्म-५ वर थांबताच फलाटावरच सहायक वाणिज्य व्यवस्थापक जायस्वाल यांच्या मार्गदर्शनात रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी फलाटावरच मासिक पारधारकांना पकडून त्यांच्याशी अरेरावीपणा केला. तसेच मासिक पासधारक म्हणजे विनातिकीट असल्याचे म्हणत त्यांच्याकडून प्रत्येकी ४०० रूपयांचा दंड वसूल केला.
कारवाईला सामोरे गेलेल्या प्रवाशांमध्ये जि.प. पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता,शासकीय मेडिकल कॉलेजचे विभागप्रमुख,गोंदिया पाटबंधारे विभाग,बाघ इटियाडोह,मध्यम लघु प्रकल्प व सार्वजनिक बांधकाम विभाग,कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी, जिल्हा रूग्णालयातील अधिकारी-कर्मचारी, बँक कर्मचारी काही अपडाऊन करणारे पत्रकार सुध्दा होते. या सर्वांना शिविगाळ व धक्काबुक्की करून रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपली निर्दयता दाखविली. या घटनेमुळे रेल्वेचे कर्मचारी प्रवाशांना कशी वागणूक देतात याची प्रचिती येते. सदर मासिक पारधारकांनी ग्राहक न्यायालयात प्रकरण दाखल करणार असल्याचेही सांगितले आहे.

बुधवारी ११.१५ वाजता गाडी फलाटावर थांबताच तिकीट तपासणीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गाडीतून उतरणाऱ्या सर्वांचीच चौकशी केली. मासिक पारधारक सांगताच ४०० रूपये दंड द्या, मगच चालते व्हा अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशीे तंबी देण्यात आली. त्यामुळे आधीच उशीर झालेल्या पासधारकांनी ४०० रूपये देवून आपली सुटका करून घेतली. मात्र ज्यांच्याकडे पैसे नव्हते व ज्यांनी देण्यास विरोध केला त्यांना जवळपास तीन तासपर्यंत डांबण्यात आल्याचे प्रवाशांनी सांगितले. दरम्यान त्यांनी सोडून देण्याची विनंती केली, मात्र सहायक वाणिज्य व्यवस्थापक जायस्वाल काहीही ऐकायला तयारच नव्हते.