23.8 C
Gondiā
Saturday, July 18, 2026
Home Top News जम्मूतील अखनूरमध्ये दहशतवादी हल्ला, ३ मृत्यूमुखी

जम्मूतील अखनूरमध्ये दहशतवादी हल्ला, ३ मृत्यूमुखी

0
22

श्रीनगर, दि. ९ – जम्मू-काश्मीरमधील अखनूर जिल्ह्यातील जौरियन येथे दहशतवाद्यांनी जनरल रिझर्व्ह इंजिनिअरिंग फोर्सच्या (GREF) कॅम्पवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात ३ जणांना प्राण गमवावे लागल्याचे वृत्त आहे.
काश्मीरमधील धुकं आणि अंधाराचा फायदा घेऊन दहशतवद्यांनी सोमवारी पहाटे हा हल्ला केल्याचे समजते. गोळीबाराचे आवाज ऐकू येताच लष्कराच्या जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. जीआरईएफचा हा कॅम्प नियंत्रण रेषेपासून (एलओसी) अवघ्या २ किलमोमीटर अंतरावर आहे. दरम्यान या संपूर्ण परिसरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.