गोंदिया-तिरोड्यात मतमोजणीला सुरवात

0
15

गोंदिया,दि.09- नगरपरिषदेच्या ४२ जागांसाठी रविवारला झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सोमवारला सकाळी 10 वाजता शासकीय तंत्रनिकेतन येथे व तिरोडा येथे 16 जागांसाठी शासकीय आयटीआय येथे सुरु होणार आहे.त्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी अनंत वालस्कर व तिरोड्याचे सुर्यवंशी, तहसिलदार अरविंद हिंगे,रविंद्र चव्हाण,मुख्याधिकारी चंदन पाटील,प्रकाश उरकुडे यांनी पुर्ण तयारी केली आहे.गोंदिया व तिरोडा येथे सुरुवातीला टपाल मतपत्रिका मोजण्यास सुरवात करण्यात आली आहे.उमेदवाराच्या प्रतिनिधीसमोर वोटींग मशीन असलेल्या रुमचे प्रवेशद्वार उघडण्यात आले.
गोंदियात 11 टेबल सुरवातीला लावण्यात येणार आहे.त्यातून 11 निकाल पहिल्यांदा हाती येतील पहिला निकाल हा सरासरी 11 ते 12 वाजेच्या दरम्यान येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तिरोडा पालिकेचा संपुर्ण निकाल हा 1 वाजेपर्यंत लागण्याची शक्यता आहे.
गोंदियात नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे अशोक इंगळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गप्पु गुप्ता, कॉंग्रेसचे राकेश ठाकूर, शिवसेनेचे दुर्गेश राहांगडाले, बसपाचे पंकज यादव मुख्य उमेदवार असून एकमेव महिला उमेदवार ज्योती उमरे या काय कमाल मतदानातून करतात याकडे लक्ष लागले आहे.62.73 टक्के मतदानाची आकडेवारी असल्याने किमान 15000 मतदान घेणारा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा विजयाचा शिल्पकार ठरण्याची शक्यता आहे.त्यातच बसप काँग्रेस राष्ट्रवादीला किती फटका देते त्यावर भाजपच्या उमेदवाराचा विजयाचा आकडा निश्चित होणार असला तर अपक्ष मामा मोटवानी यांनी सिंधी काॅलनीसह त्या प्रभागात भाजपच्या मताना फोडले असल्यास भाजपच्या उमेदवाराचा विजयाचा अंतर कमी होण्याची शक्यता आहे.शिवसेनेच्या दुर्गेश रहागंडाले यांना समाजाने किती साथ दिली हे सुध्दा महत्वाचे ठरणार आहे.बसपचे पंकज यादव यांनी कुंभारेनगर,श्रीनगर भागातील मतदारावर आपली पकड मजबूत केल्यास निकालावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नगरसेवक पदासाठी भाजप चे शिव शर्मा, भावना कदम,श्रध्दा अग्रवाल,मैथुला बिसेन,पकंज सोनावाने, घनश्याम पानतवणे, जीतेद्र पंचबुद्धे, राष्ट्रवादीतर्फे,रमण उके,लता रहागंडाले,नेहा पटले,खालीद पठाण,सुशीला भालेराव बेबीनंदा बन्सोड, रमेश कुरील,मालती राजु कापसे, कॉंग्रेसतर्फे लोकेश राहांगडाले,शकील मंसुरी,अजय फेंडारकर, शिवसेनेतर्फे सोनू कुथे, राजकुमार कुथे,हर्षपाल रंगारी बसपा तर्फे कान्हा यादव, मनसेचे सुरेश ठाकरे या दिग्गजांचा भवितव्याचा फैसला देखील आज होणार आहे. विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेर जमायला सुरुवात केलेली असून कसलाही अनुचित प्रकार घडू नये साठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून दारुदुकाने आज सायकांळपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.

तिरोडा येथे नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ममता बैस व भाजपच्या सोनाली देशपांडे यांच्यात खऱी लढत असून राष्ट्रवादीच्या उमेदवार या प्रभावी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.याठिकाणी नगराध्यक्षपदाचा जो कुणी उमेदवार निवडून येईल तो 500-1000 मताच्या दरम्यान निव़डून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सोबतच भाजपला यावेळी नगरसेवकांची संख्या वाढविण्यात मदत होणार आहे.कांँग्रेस जागा वाचविते की नाही यावर सुध्दा शंका आहे.राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उमेदवारामूळे भाजपला लाभ होण्याची शक्यता आहे.