आज कॅशलेस गोंदियासाठी सभा

0
11

गोंदिया,दि.१६ : कॅशलेस गोंदिया मिशन राबविण्यासाठी आज १६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २६ जानेवारीपर्यंत जिल्हयातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी स्वेच्छेने या मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी या सभेला उपस्थित राहावे. या सभेला जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे व अन्य मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तरी या मिशनमध्ये काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक-युवतींनी हेल्पलाईन नंबर ९०२१५८१९४७ यावर संपर्क साधावा. तसेच bit.ly/cashlessvolunteer यावर नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.