9 फेबुवारीला मुख्यमंत्री नितिशकुमार व ममता बॅनर्जी गोंदियात

0
10

गोंदिया,दि.20 : गोंदिया-भंडारा जिल्ह्यात शैक्षणिक सुविधा व्यापक करणारे शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या 110 व्या जयंतीनिमित्त ९ फेबु्रवारीला मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित समारंभाला यावेळी विशेष अतिथी म्हणून बिहारचे लोकप्रिय मुख्यमंत्री नितिशकुमार व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.प्रफुल्ल पटेल राहणार आहेत.गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ, स्व.मनोहरभाई पटेल स्मृति समिती तथा मनोहरभाई पटेल अँकेडमीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.या कार्यक्रमात नागरिकांनी उपस्थित राहून विद्याथ्र्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष व मनोहरभाई पटेल अकादमीच्या अध्यक्ष श्रीमती वर्षा पटेल, सचिव आ.राजेंद्र जैन यांनी केले आहे.या जयंती कार्यक्रमाच्या पावनपर्वावर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शालान्त तथा स्नातक परीक्षांमध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करणाèया गुणवंत विद्याथ्र्यांना स्व.मनोहरभाई पटेल स्मृती स्वर्णपदक बहाल करून त्यांचा गौरव केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या मनोहरभाई पटेल जयंती उत्सवानिमित्त स्वर्णपदक वितरण समारोहाला देशातील नामांकित व्यक्तींची उपस्थिती राहणार आहे.